Orange Growers Farmer : संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का? संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Orange Growers Farmer : आपल्याकडे अनेक जण फळबाग लागवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो म्हणून अनेकजण याची लागवड करत आहेत. मात्र सध्या चित्र वेगळ दिसत आहे. फळबाग लागवडी मधून देखील शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान विदर्भामध्ये सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड हा भाग ओळखला जातो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने आणि बदलत्या हवामानामुळे या ठिकाणच्या संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत

झाडाला आलेली संत्र्याची फळगळ होऊन संत्र्याचा शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नाश होताना दिसत आहे. मात्र यावर काही उपाययोजना करून याबाबत अजूनही कृषी विभागाकडून मार्गदर्शक मिळाल नसल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत. कृषी विभागाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे संत्र्याचे नुकसान होत असल्याचं शेतकरी म्हणत आहेत. त्याचबरोबर गळालेल्या संत्र्याची प्रशासनाकडून काहीच संत्रा बागेची पाहणी करण्यात आली व पंचनामे केले गेले मात्र अनेक संत्रा बागायतदारांचे पंचनामे करणे तसेच राहिले आहे. (Orange Growers Farmer)

संत्र्याला किती बाजार भाव मिळतो?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घर बसल्या संत्र्याला किती बाजार भाव मिळतो याबाबतची माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही संत्र्याला तसेच इतर शेतमालाला किती बाजार भाव मिळतो याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर सरकारी योजना, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, पशुंची खरेदी विक्री, शेतकऱ्यांच्या जुगाडाची माहिती, जमीन मोजणी, हवामान अंदाज इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता तेही अगदी मोफत.

संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी अधिकारी गेलेच नाहीत त्यांचे पंचनामे न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार. संत्र्याची माती झाल्यावर तुम्ही पंचनामे करणार का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी संत्र्यातून चांगले उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळत असते मात्र यावर्षी पावसाने दडी मारली आणि हवामानात बदल झाला त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

error: Content is protected !!