Orange Variety : संत्रीच्या दोन नवीन प्रजाती विकसित; वाचा… एकरी किती उत्पादन मिळते!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील नागपूरची संत्री (Orange Variety) देशभरात विशेष प्रसिद्ध आहे. गोडी आणि गुणवत्तेसाठी नागपूरच्या संत्रीला तोड नाही. मात्र आता मध्यप्रदेशातील झांसी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संत्रीच्या दोन नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. शास्रज्ञांनी विकसित केलेल्या या तीन प्रजाती या नागपूरच्या संत्रीच्या तोडीस तोड आणि मध्य भारतातील वातावरणास अनुकूल असल्याचे राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाने म्हटले आहे. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या संत्रीच्या दोन जाती (Orange Variety) विद्यापीठाकडून विकसित करण्यात आल्या आहेत.

‘या’ आहेत नवीन प्रजाती (Orange Variety Developed Jhansi Agri University)

पूसा राउंड, पूसा शरद या संत्र्याच्या दोन नवीन प्रजाती (Orange Variety) आहे. विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या या नवीन प्रजातीची तीन वर्षानंतर फळधारणा होते. या प्रजातीच्या संत्री फळाचा आकार सामान्य संत्र्याच्या तुलनेत मोठा आहे. त्यामुळे या प्रजातींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यापीठाच्या फळबाग विभागाचे प्रमुख डॉ. रंजीत पॉल यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रासह मध्य भारतातील वातावरण हे लिबूवर्गीय पिकांच्या विशेषतः संत्र्याच्या लागवडीसाठी उत्तम आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यासांठी या प्रजाती खूप फायदेशीर असणार आहे.

नवीन प्रजातींची वैशिष्ट्ये

  • नागपुरी संत्रांच्या तोडीस तोड गुणवत्ता आणि आकाराने मोठे फळ.
  • मध्य भारतातातील वातावरणास अनुकूल.
  • या प्रजातींच्या लागवडीसाठी काळी कसदार जमीन आवश्यक तसेच वर्मी कंपोस्टचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते.
  • माती आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित केले तर आकाराने नागपूरी संत्रीपेक्षाही मोठी फळे मिळतात.
  • लागवडीनंतर तीन वर्षात फळधारणा होते.
  • पूसा राउंड या प्रजातीच्या एका झाडापासून एका हंगामात जवळपास 390 फळे, तर पूसा शरद प्रजातीच्या झाडापासून हंगामात 347 फळे मिळतात.
  • पूसा राउंड या प्रजातीच्या एका फळाचे वजन 293 ग्रॅम तर त्यातील रसाचे प्रमाण हे 100 ते 150 मिली इतके असते.
  • पूसा शरद या प्रजातीच्या एका फळाचे वजन 237 ग्रॅम इतके असते.
  • दोन्ही प्रजातीच्या एका झाडापासून 5 वर्षांच्या आत 1 ते 1.25 क्विंटलपर्यंत संत्रीचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.
  • अर्थात एका एकरात शेतकरी या जातीचे 200 झाडे लावून, लागवडीनंतर पाचव्या वर्षापासून एकरी 200 क्विंटल संत्रीचे उत्पादन मिळवू शकतात.
  • रसनिर्मिती उद्योग सध्या चांगला जोमात असल्याने, या संत्रीला 40 से 50 रुपये प्रति किलो इतका दर हमखास मिळतो.

error: Content is protected !!