Orchard Farming : खतांचा ओवरडोस म्हणजे काय? फळ शेती करताना असा ओळखा ओवरडोस!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेकदा शेतकरी भाजीपाला किंवा फळशेती (Orchard Farming) करताना रासायनिक खतांचा अधिक वापर करतात. ज्यामुळे जमिनीची रचना बिघडते. आणि फळ झाडांची किंवा भाजीपाल्याची वाढ खुंटते. पिकांना अधिक खते दिल्यास, पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जेव्हा फळ झाडांना अधिक प्रमाणात खते दिली जातात. तेव्हा ती जमिनीतील पाणी शोषून घेण्यास असमर्थ ठरतात. फळ झाडांना खते जास्त झाल्यास जमिनीतील मातीची रचना बदलते. याशिवाय मातीतील पिकांसाठीच्या फायदेशीर सूक्ष्मजीवांना हानी पोहोचते. फळ झाडांना (Orchard Farming) पुरेसे पाणी आणि पोषक तत्वे पुरवण्यासाठी मुळांची प्रणाली अपुरी ठरते.

फळझाडांचे मानवाप्रमाणेच (Orchard Farming Fertilizer Overdose)

फळ झाडे त्यांच्या मुळांभोवती पोषक तत्त्वांच्या पातळीत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेतात. मात्र, जेव्हा पोषक तत्वांची पातळी अधिक सुसंगत असते. तेव्हा फळांची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होतो. अर्थात फळधारणेस फायदा होण्यासाठी खतांचा योग्य वापर (Orchard Farming) करणे आवश्यक असते. खते योग्य प्रमाणात दिली गेल्यास फळ झाडांच्या मुळांभोवतीची पोषक तत्वांची पातळी स्थिर राहते. वनस्पती देखील मानवाप्रमाणेच असतात. जेव्हा माणूस भरपेट खातो. तेव्हा तो सुस्त होतो. अर्थात पोट योग्य प्रमाणात भरलेले असेल किंवा खूप भूक लागलेली नसेल. अशा स्थितीत माणूस चांगले काम करू शकतो. त्याच पद्धतीने फळ शेतीसाठी योग्य प्रमाणात खते देणे आवश्यक असते.

अधिक खते देणे हानिकारक

फळ पिकांना अधिक खते देणे (Orchard Farming) हानिकारक ठरू शकते. अनेक शेतकरी आपल्या पिकांसाठी मोठ्या प्रमाणात नायट्रोजन वापरत असतात. त्यापैकी काही प्रमाणात नायट्रोजनचे बाष्पीभवन होते आणि काही प्रमाणात पाण्याद्वारे जमिनीत जाते. याउलट फळ शेती करताना ज्या झाडांना योग्य प्रमाणात खत मिळते. ते जलद वाढतात आणि चांगले दिसतात. तुम्ही तुमच्या फळ झाडांना जास्त खत देत आहात का? ते सहज ओळखता येते. पुढील बाबी लक्षात घेऊन ते समजते.

असे ओळखा खते जास्त झाल्यास

  • झाडाची खालील बाजूची पाने पिवळी पडतात किंवा कोमजतात.
  • पानांच्या कडा आणि आतील रेषा तपकिरी होतात.
  • फळ झाडांची मुळे काळी, तपकिरी किंवा सडलेली आढळून येतात.
  • फळ झाडांची वाढ खुंटते किंवा पानगळ होते.

तत्काळ ‘हा’ उपाय करा

फळ शेती करताना झाडांना अतिरिक्त खते दिली गेल्याचे आढळून आल्यास, अशावेळी फळ झाडांना अधिक काळापर्यंत सतत पाणी द्या. किंवा मग शक्य असेल तर फावड्याने मुळांपासून दिलेले खत बाजूला करा. तसेच फळ झाडांना अधिक काळापर्यंत नियमित पाणी देणे सुरु ठेवा. ज्यामुळे खतांचे प्रमाण कमी होऊन, झाडांना पाणी मिळाल्याने पोषक तत्वांचा पुरवठा होण्यास मदत होईल.

error: Content is protected !!