हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे. महिना हुन गेला तरी अवकाळी पाऊस काय पाठ सोडायचं नाव घेईना. अशातच भरीस भर म्हणजे उन्हाळ्यामुळे उष्णतेची लाट उसळत असून राज्यातील फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय. यामुळे बळीराजा चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे.
राज्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील गोवर्धन शिंदे यांच्या पपई फळबागावर मोठा परिणाम होताना दिसतोय. याआधी अवकाळी पावसापासून पपईचे नुकसान होण्यावाचून बचाव झाला. मात्र आता उष्णतेच्या लाटेमुळे पपई या फळपिकांवर मोठा परिणाम झाला असून वातावरणाचा परिणाम हा फळपिकांना होतोय.
राज्यात यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडताना दिसतो. हाच अवकाळी पाऊस याआधी फेब्रुवारी, मार्च महिन्यात पडत असल्याचे कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे उष्णतेमुळे पाणी टंचाई पहायला मिळते. यामुळे शेतकरी आता संकटात सापडला आहे. उन्हाळ्यामुळे विहिरी कोरड्या पडल्याने शेतकरी अधिकाधिक संकटात सापडला आहे. तलावातील पाणी टंचाई निर्माण झाल्याने याचा परिणाम आता फळबागांवर पहायला मिळतो. मागील वर्षापेक्षा यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे.