Organic Farming : पिकांसाठी घरच्या घरी बनवा ‘अग्नी अस्र कीटकनाशक’; तणही होईल समूळ नष्ट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून जैविक पद्धतीने (Organic Farming) शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. प्रामुख्याने उच्चभ्रू लोकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीमध्ये पिकवल्या जाणाऱ्या सेंद्रिय उत्पादित मालाला मोठी मागणी वाढली आहे. परिणामी, आता तुम्ही देखील जैविक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेत असाल. तर ‘अग्नी अस्र कीटकनाशक’ तुमच्यासाठी शेती करताना वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे या कीटकनाशकाच्या वापरामुळे तुमचा शेतीसाठीचा रासायनिक कीटकनाशकांचा खर्च पूर्णपणे कमी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘अग्नी अस्र कीटकनाशक’ कसे तयार करतात? शेतीमध्ये ‘अग्नी अस्र कीटकनाशका’चे (Organic Farming) काय फायदे आहेत? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…

कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ‘अग्नी अस्र कीटकनाशक’ नैसर्गिक आणि जैविक शेतीमध्ये (Organic Farming) उपयोग होणारे जैविक कीटकनाशक आहे. या ‘अग्नी अस्र कीटकनाशकाची’ निर्मिती तुम्ही आपल्या आसपास असणाऱ्या घरगुती वस्तूंपासून करू शकतात. हे जैविक कीटकनाशक सर्व नैसर्गिक वस्तूंचा वापर करून अत्यल्प खर्चात बनवले जाते. जे शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि जैविक करताना एखाद्या दैवी ब्रह्मास्त्र पेक्षा कमी नाहीये.

‘या’ रोगांवर आहे गुणकारी? (Organic Farming Agni Asra Insecticide)

कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अग्नी अस्र कीटकनाशक हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त मानले गेले आहे. यामध्ये फळांना छिद्रे पाडणारी किडी, फळे कुर्तडनारी किडी, पाने खाणारी किडी, देठ कुर्तडनारी किडी याशिवाय देठांना छिद्रे पाडणारी किडी अशा सर्व प्रकारच्या कीड नियंत्रणासाठी अग्नी अस्र कीटकनाशक हे खूप उपयोगी ठरते. इतकेच नाही तर या ‘अग्नी अस्र’ खताच्या उपयोगातून तण नियंत्रणासाठी देखील मदत होते. त्यामुळे भाजीपाला शेतीसाठी या अग्नी अस्र कीटकनाशकाचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. वांग्याची लागवड केल्यानंतर प्रामुख्याने ऐन वाढीच्या कालावधीत पानांवर पांढरा थर जमा झालेला दिसतो. अशावेळी ऐन अंडी स्वरूपात असणाऱ्या किडीवर हे जैविक कीटकनाशक फवारल्यास कीड नियंत्रणात मोठी मदत होते.

कसे बनवतात अग्नी अस्र कीटकनाशक?

अग्नी अस्र खाद/कीटकनाशक बनवताना 20 लीटर देशी गायीचे गोमूत्र, 5 किलो कडुनिंबाची पाने, 500 ग्रॅम तंबाखू पावडर, 500 ग्रॅम तिखट हिरवी मिरची, 500 ग्रॅम लसूण यांची आवश्यकता असते. तुम्ही प्रामुख्याने गोमूत्रमध्ये बारीक केलेली कडुनिंबाची पाने आणि अन्य सर्व सामग्री मिसळून कमी जाळावर उकळी येईपर्यंत शिजवावे. त्यानंतर उकळलेले हे मिश्रण 48 तास झाडाच्या सावलीत ठेवावे. आणि दिवसातून दोन वेळा ढवळत राहावे. त्यानंतर एका जाळीदार कापडाने हे मिश्रण गाळून घ्यावे. आणि वापर करताना 100 लीटर पाण्यात 10 लीटर ‘अस्र कीटकनाशक’ मिसळून प्रति एकर पिकांवर फवारणी करावी.

error: Content is protected !!