Organic Fertilizer : शेतात ‘हे’ खत वापराल तर कमी खर्चात पीक येईल जोमात, पहा कसं तयार करायचं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Organic Fertilizer : जमीन सुपिकतेसाठी तसेच पिकांच्या वाढीकरिता गांडूळखत हे महत्त्वाचे मानले जाते. गांडुळाच्या विष्ठेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नघटक असतात. त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत ठेवण्यासाठीही मदत होते. अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने आपण अनेक कामे सोपे करू शकतो अन याचंच एक भाग म्हणजे गांडूळ खत होय. गांडूळ खताचा वापर केल्याने अनेक प्रकारचे फायदे शेतकऱ्याला होतात.

गांडुळांची निवड –

फायटोफॅगस, एपीजी किंवा ह्युमस फॉर्मर या गटातील गांडुळे यशस्वीपणे गांडूळ खत तयार करतात. या उलट एंडोजीज जीओफेगस जमिनीत खोल जाणारी गांडुळे गांडूळ खत तयार करण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.
गांडूळ पैदास करणाऱ्या खड्ड्यावर दिवसभर सावली राहिल, याप्रमाणे छप्पर करावे. सदरहू जमिन पाण्याचा निचरा होणारा असावी. साधारणपणे 2000 गांडूळे खड्ड्यामध्ये सोडून त्यांच्यापासून प्रजनन तसेच गांडूळखत तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी.

– जमिनीमध्ये 20 सें.मी. खोलीचा 1 मीटर लांब व 60 सें.मी. रूंद असा खड्डा खोदावा. या खड्ड्यामध्ये पाणी साठू नये म्हणून कडेने जमिनीमध्ये चर खोदावा. या खड्ड्यामध्ये अर्धे कंपोस्ट खत व अर्धे कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा. म्हणजे हा गादीवाफा तयार होईल. हे खाद्य अंदाजे 200 कि.ग्रॅ. होते.
– या गादी वाफ्यामध्ये 2000 गांडूळे सोडावीत. गांडुळे सोडल्यावर या गादीवाफ्यावर गोणपाटाचे आच्छादन करून त्यावर दिवसातून 3 वेळा पाणी शिंपडावे. म्हणजे गादी वाफ्यामध्ये ओलसरपणा टिकून राहिल. या पद्धतीमध्ये 10 दिवसांत गांडूळखत तयार होते.
– हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळखत बाजूला करावे. शक्यतो खत वेगळे करताना अवजारांचा (टिकाव, खोरे, खुरपे इ.) वापर करू नये. त्यामुळे गांडूळांना इजा पोहचते. पूर्ण वाढ झालेली गांडुळे वर नमूद केल्याप्रमाणे पुन्हा गादी वाफ्यात सोडावीत.
– या गांडूळ खतामध्ये गांडुळाची अंडी विष्टा, कुजलेले शेणखत व माती यांचे मिश्रण असते. हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते किंवा छोट्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, माती यांचे मिश्रण टाकून त्यात मिसळून द्यावे. तेथे गांडूळाची पैदास होते.

error: Content is protected !!