Osmanabadi Goat: उस्मानाबादी शेळी का आहे भारतात प्रसिद्ध? जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्व शेळ‌यांमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असणारी उस्मानाबादी शेळी (Osmanabadi Goat) राज्याच्या सर्वच भागात आढळते. प्रामुख्याने मराठवाड्यातील बालाघाट डोंगराळ पट्ट्यात, काटकपणा आणि चविष्ट मांसासाठी तयार झालेली संपूर्ण काळी शेळी म्हणजे उस्मानाबादी शेळी होय.

मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातली असल्यामुळे या शेळीला उस्मानाबादी (Osmanabadi Goat) हे नाव पडले आहे. ही शेळी महाराष्ट्रातील अहमदनगर, लातूर, परभणी, सोलापूर, जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये सुध्दा आढळून येतात. उस्मानाबादी शेळी तिच्या उपयुक्ततेमुळे आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्यात सुद्धा आढळून येते. मांस व दुग्धउत्पादन दोन्हीसाठी योग्य असली तरी या शेळीचे मांस हे उत्कृष्ट गुणवत्तेचे असल्यामुळे मुख्यत्वे करुन मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळी पाळली  जाते. या शेळीच्या मांसासोबतच कातडीला सुध्दा बाजारात चांगली मागणी आहे.

शारीरिक रचना

या शेळ्या अनेक रंगांच्या असल्या तरी बहुतेक शेळ्या काळ्या रंगाच्या असतात आणि त्यांच्यावर तपकिरी किंवा पांढरे ठिपके असतात. कान लोंबकळणारे, शिंगे मागे वळलेली असतात. या जातीच्या बोकडांना शिंगे असतात, तर फक्त 50% शेळ्यांना शिंगे असतात, बाकीच्यांना नसतात. कपाळ बर्हिवक्र असून उंची 65 ते 70 सें.मी. असते. या जातीच्या शेळीचे वजन 32 किलोपर्यंत असतं, तर बोकडाचे वजन सुमारे 34 किलो असते. करडांचे जन्मता सरासरी  वजन 2 ते 2.5  किलो एवढे असते.

प्रजनन माहिती

जन्मापासून माजावर येण्याचे वय 7 ते 8  महिने असून,  गाभण काळ 145-150  दिवसाचा असतो.  प्रथम विण्याचे  वय  13 ते 14 महिने असते. उस्मानाबादी  शेळीत एक करडे  जन्म देण्याचे प्रमाण 39 टक्के, जुळे पिल्ले 51टक्के, तिळे 10 टक्के तर तीन पेक्षा जास्तचे प्रमाण 5 टक्के एवढे असते. दोन सलग वेतातील अंतर 210 ते 245 दिवस असते.

उत्पादन

उस्मानाबादी शेळी (Osmanabadi Goat) दररोजचे सरासरी दूध उत्पादन 0 .5 ते 1.5 लिटर एवढे असून, दूध देण्याचा कालावधी 3 ते 5 महिन्यांचा असतो. मांसासाठी तयार झालेल्या शेळ्यांमध्ये शरीर वजनाच्या 45 ते 50 टक्के मांस मिळते.

error: Content is protected !!