…अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी, रविकांत तुपकरांचा सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्यांवरून राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून २२ नोव्हेम्बर पर्यंत मागण्यांचा निर्णय झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसह २४ नोव्हेम्बर रोजी मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यापूर्वी सोयाबीन आणि कंपास उत्पदक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे ६ नोव्हेम्बर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सोयाबीनला साडेआठ हजार तर कापसाला साडेबारा हजार रुपये भाव द्यावा, आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी रविकांत तुपकरांनी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. आठ दिवसानंतर महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू असा इशारा तुपकरांनी भाषणात दिला होता. दरम्यान, काल (16 नोव्हेंबर) रविकांत तुपकरांनी आंदोलनाच्या पुढची टप्प्याची घोषणा केली आहे.

जीव गेला तरी मागे हटणार नाही

येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा. अन्यथा 23 नोव्हेंबरला सोयाबीन, कापूस उत्पादक पट्टयातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे कूच करु, 24 नोव्हेंबरला गिरगाव चौपाटी परिसरातील मंत्रालयाशेजारी असलेल्या अरबी समुद्रात हजारो शेतकरी जलसमाधी घेतील असा इशारा तुपकरांनी दिला आहे. अतिवृष्टीने खचलेला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठयावर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दररोज वाढ होत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाचे काही देणे घेणे नाही. सरकारला आमचे मुडदेच हवे असतील तर आता सरकारच्या दारातच आमचे मुडदे पडतील, आता जीव गेला तरी मागे हटणार नाही असेही रविकांत तुपकरांनी म्हटले आहे.

काय आहेत मागण्या ?

–उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के या सूत्राप्रमाणे सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार तर कापसाला दिड हजार रुपये भाव द्या.
–सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा.
–आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा.
— खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावा.
–ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा.
–शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे.
–जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
— त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.

error: Content is protected !!