Pack House Subsidy : बातमी कामाची! पॅक हाऊस बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान, अर्ज कसा करायचा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pack House Subsidy in Maharashtra : बातमी कामाची! राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅकिंग हाऊस बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवत असते. या योजनांचा अनेक शेतकरी फायदा देखील घेत असतात. यामध्येच एक योजना म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना ही केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे. ही योजना फलोत्पादन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. फलोउत्पादन करणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक साह्याने मिळावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पतींची पिके त्याचबरोबर काही फळ पिके यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 30 ते 50 मीटर टन प्रतिवर्षी या क्षमतेच्या पॅक हाऊसची उभारणी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. पॅक हाऊस ही अशी सुविधा आहे ज्यामध्ये फळे आणि भाज्यांची साफसफाई केली जाते त्याचबरोबर प्रतवारी केली जाते आणि विपणनासाठी पॅक केली जाते शेतकऱ्यांना पॅक हाऊस बांधण्यासाठी जवळपास सरकार 50 टक्के अनुदान देत आहे. म्हणजेच थोडक्यात दोन लाख रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना सरकार देत आहे. (Pack House Subsidy)

या ठिकाणाहूनही करता येईल अर्ज

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घर बसले अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही अगदी काही वेळातच या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर योजनेमध्ये काय पात्रता आहे? अर्ज कधी सादर करायचा या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला अगदी अचूकपणे त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा आणि अनुदानाचा लाभ घ्या.

पॅकिंग हाऊस बांधण्यासाठी येतो चार लाख रुपयांचा खर्च

पॅकिंग हाऊस बांधण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास चार लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चापैकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी तीन लाख खर्च ग्राह्य धरण्यात येतो. त्याचबरोबर इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक लाख भांडवल खर्च ग्राह्य धरण्यात येतो. असा सर्व मिळून चार लाख रुपयापर्यंत खर्च शेतकऱ्यांना येतोय यामध्ये सरकार 50% अनुदान देते म्हणजे दोन लाख रुपये सरकार देते आणि दोन लाख रुपये शेतकऱ्यांना गुंतवावे लागतात

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व्यावसायिक प्रमाणात फळे किंवा भाज्यांची लागवड करत असावे. त्याचबरोबर शेतकऱ्याकडे किमान ०.५ एकर जमीन असणे आवश्यक आहे. आणि शेतकऱ्याचे बँकेमध्ये खाते देखील असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. कागदपत्रे शेतकऱ्यांना संबंधित फल उत्पादन विभागाकडे सादर करणे गरजेचे आहे. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेता येईल यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते खालील प्रमाणे पाहुयात

  • जमिनीच्या मालकीची कागदपत्रांची प्रत
  • बँक खात्याच्या विवरणाची प्रत
  • पॅकिंग हाऊसच्या बांधकामाचा प्रकल्प प्रस्ताव.

ही संपूर्ण प्रक्रिया शक्यतो ऑनलाईन केली जाते फुलोत्पादन विभाग अर्जाची पुनरावलोकन करेल आणि पात्रता निकष पूर्ण करत असल्यास ते अनुदान तुम्हाला मंजूर केले जाते.

error: Content is protected !!