Paddy Bonus : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना 13 हजार 320 कोटी वितरित; 24 लाख शेतकऱ्यांना फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जसजशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची (Paddy Bonus) वेळ जवळ येत आहे. तसतशी सध्या भाजपसहित राज्यांमध्ये लोकप्रिय योजनांच्या घोषणा आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या कार्याला वेग आला आहे. छत्तीसगड या राज्यामध्ये देखील भाजपशासित सरकार असून, तेथील राज्य सरकारने शेतकऱ्यांना धान पिकासाठी 3100 रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी नुकताच एक कार्यक्रम आयोजित करत, राज्यातील शेतकऱ्यांना धान पिकासाठीची अनुदान रक्कम जमा केली आहे. यामध्ये जवळपास राज्यातील 24 लाख 75 हजार शेतकऱ्यांना 13 हजार 320 कोटींची रक्कम बोनस (Paddy Bonus) स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

प्रति क्विंटल 917 रुपये बोनस (Paddy Bonus For Farmers)

उपलब्ध आकडेवारीनुसार छत्तीसगड या राज्यामध्ये 2023-24 मध्ये 24.72 लाख शेतकऱ्यांकडून हमीभावाने एकूण 144.92 लाख टन धानाची सरकारी खरेदी करण्यात आली आहे. ज्यात प्रामुख्याने २१८३ रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करण्यात आली आहे. अर्थात सरकारने शेतकऱ्यांकडून एकूण 31 हजार 914 कोटींची धान खरेदी केली आहे. तर त्यावर एकूण अतिरिक्त 917 रुपये बोनस (Paddy Bonus) देत, छत्तीसगड सरकारकडून नुकताच एक कार्यक्रम आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 13 हजार 320 कोटी रुपये जमा केले आहे.

शेतकऱ्यास 8 लाख 76 हजार रुपयांचा बोनस

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी बालोद जिल्ह्यातील भरदा खुर्द गावचे शेतकरी रामाधार साहू यांना बोनसच्या रकमेचा चेक सुपूर्द करत या योजनेची सुरुवात केली आहे. शेतकरी रामाधार साहू हे आपल्या 36 एकर जमिनीत धानाची शेती करतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादित धानाच्या एकूण विक्रीतून त्यांना 8 लाख 76 हजार रुपयांच्या बोनस रकमेचा चेक मिळाला आहे. यावेळी बोनस रक्कम मिळाल्यानंतर शेतकरी साहू यांनी शेतीतील उत्पादन वाढीसाठी ही रक्कम वापरणार असल्याचे म्हटले आहे.

error: Content is protected !!