Paddy Bonus : ‘या’ पिकाला 20 हजारांचा बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात धान उत्पादक (Paddy Bonus) शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर (Paddy Bonus) करण्यात आला आहे. नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

एक हजार कोटी रुपयांची तरतूद (Paddy Bonus For Farmers)

मागील वर्षीच्या (2022-23) हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस (Paddy Bonus) देण्यात आला होता. याचा 4 लाख 80 हजार शेतकऱ्यांना लाभ झाला होता. हा बोनस प्रति शेतकरी जास्तीत-जास्त दोन हेक्टरपर्यंत देण्यात आला होता, त्यासाठी 823 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. मात्र आता यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजारांचा बोनस देण्यात येणार आहे. यावर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना हा बोनस दिला असून, त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. असेही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी

दरम्यान, नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 335 गावांमध्ये या अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर (Paddy Bonus) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी नागपूर जिल्ह्यात मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, सावनेर व हिंगणा या सहा तालुक्यात धान पिकांचे मोठे नुकसानीची त्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर आता अधिवेशनाच्या सांगतेला सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!