Paddy Bonus : धान अनुदान, सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20 हजार रुपये जमा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी या साऱ्या नैसर्गिक संकटांसह (Paddy Bonus) शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बेजार झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये एवढे बोनस देण्याचे जाहीर केले होते. अर्थात अलीकडेच त्याबाबत जीआर देखील जारी करण्यात आला होता. ज्यात राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनसची (Paddy Bonus) ही रक्कम दिली जाणार आहे.

प्रति शेतकरी 40 हजार बोनस (Paddy Bonus For Farmers)

धान अर्थातच भात हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड पावसाळ्यात अर्थातच खरीप हंगामात केली जाते. राज्यातील विदर्भ विभाग हा धान उत्पादनासाठी अर्थातच भात उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सरकारच्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याला कमाल चाळीस हजार रुपयांपर्यंतचा बोनस मिळणार आहे. त्यानुसार, गोंदिया या प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमधील पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली आहे. असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

236 कोटी रुपये वितरित

राज्यातील ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली होती. त्यांना ही बोनसची रक्कम वितरित करण्यात आली आहे. खरेतर या बोनससाठी गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले आहेत. दरम्यान, या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन अनुदान अर्थातच बोनस वितरित केला गेला आहे. असल्याचे सरकारी पातळीवरून सांगण्यात आले आहे. या संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर बोनसचे २३५ कोटी ७६ लाख रुपये जमा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

रकमेत हेक्टरी 5000 रुपये वाढ

मागील वर्षी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये आणि 2 हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेत बोनस वितरित करण्यात आला होता. यंदा मात्र बोनसची रक्कम 5000 रुपयांनी वाढवली गेली आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये एवढी रक्कम बोनस स्वरूपात दिली जात आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील पात्र १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग धानाच्या बोनसची रक्कम पाठवण्यात आली आहे. तर उर्वरित १९५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील लवकरच बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना भांडवलासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!