Paddy Crop Bonus : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 13,000 कोटी मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान (Paddy Crop Bonus) देण्याबाबत, महाराष्ट्र सरकारने नुकताच मागील आठवड्यात जीआर जारी केला आहे. अशातच आता छत्तीसगड सरकारने धान उत्पादकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 24 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 12 मार्च 2024 रोजी एकूण 13,000 कोटींची रक्कम वितरित केली जाणार आहे. हमीभावाने खरेदी व्यतिरिक्त, ‘बोनस’ म्हणून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना धान पिकासाठी (Paddy Crop Bonus) ही रक्कम वितरित केली जाणार आहे. अशी माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी जारी केली आहे.

3100 रुपये प्रति क्विंटलची घोषणा (Paddy Crop Bonus For Farmers)

छत्तीसगडमधील 24 लाख शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना धान उत्पादकांसाठी बोनस स्वरूपात, अतिरिक्त 13,000 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने प्रामुख्याने 3100 रुपये प्रति क्विंटल, राज्यातील धान उत्पादकांकडून धान खरेदी केली जाईल, असे हंगामाच्या सुरुवातीला जाहीर केले होते. असेही त्यांनी म्हटले आहे.

917 रुपये अतिरिक्त मिळणार

यावर्षी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या धानाची 2183 रुपये प्रति क्विंटल खरेदी झालेली आहे. अर्थात शेतकऱ्यांना प्रति क्विंटलसाठी अतिरिक्त 917 रुपये देण्यासाठी ही रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी सरकारकडे हमीभाने खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. अशा छत्तीसगडमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 12 मार्च 2024 रोजी ही रक्कम वितरित केली जाणार आहे. असेही मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी म्हटले आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) सरकार आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणुकीची तयारी असून, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हंगामाच्या सुरुवातीला बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती, अशी चर्चा सध्या सुरु आहे. तर भारतीय जनता पक्ष मात्र शेतकऱ्यांना दिलेले बोनस देण्याचे आश्वासन आपण पाळले असल्याचे म्हणत, स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.

error: Content is protected !!