Paddy Farming : धान लागवडीची ‘ही’ पद्धती देते अधिक उत्पादन; रिपोर्टमधून माहिती समोर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम (Kharif) जवळ येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आपआपल्या परीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे धान शेतीसाठी (Paddy Farming) शेतकऱ्यांना बियाणे (Seeds) आणून आधी रोपे तयार करावी लागतात. त्यानंतर पावसाचा अंदाज पाहता, भात लावणी (Rice Sowing) केली जाते. मात्र आता धान शेतीसाठी ‘डीएसआर पद्धत’ (DSR sowing system) समोर आली आहे. ‘डीएसआर पद्धत’ म्हणजे थेट पेरणी पद्धत होय. या पद्धतीतुन अनेक फायदेशीर गोष्टी समोर आल्या असून, त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण डीएसआर पद्धतीबाबत (Paddy Farming) अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

मिळते अधिक उत्पादन? (Paddy Farming DRS System For Farmers)

डीएसआर पद्धतीबाबत एक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये डीएसआर पद्धतीच्या (Paddy Farming) चांगल्या बाजू आणि नुकसानकारक बाजूंचा आढावा घेण्यात आला आहे. या अहवालातील माहितीनुसार, 47 टक्केहुन अधिक छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पारंपारिक लावणी पद्धतीऐवजी डीएसआर पद्धतीचा अवलंब केला. ज्यात त्यांना लावणी पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. या अहवालाबाबत देशातील तीन राज्यांमधील वेगवेगळ्या हवामानातील नऊ जिल्ह्यांमध्ये डीएसआर पद्धतीबाबत परीक्षण करण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

काय आहे डीएसआर पद्धत?

डीएसआर ही धान (Paddy) लागवडीची अशी पद्धती आहे. ज्यामुळे इतर पिकांप्रमाणे बियाणे आणून थेट धान पिकाची पेरणी केली जाते. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना बियाण्यापासून रोपे तयार करणे, तयार केलेल्या रोपांची लावणी करावी लागते. डीएसआर पद्धतीत पेरणीनंतर शेतात पाणी सोडले जाते. तर पारंपारिक पद्धतीत खाचरात पाणी सोडून रोपण केले जाते. या दोन्ही पद्धती भारतात खूप दिवसांपासून प्रचलित आहे. मात्र, यातील डीएसआर पद्धत प्रमुख धान उत्पादक भागांमध्ये लोकप्रियता मिळवण्यात आतापर्यंत कमी पडली आहे.

‘या’ आहेत प्रमुख अडचणी

डीएसआर पद्धतीत काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या पद्धतीने घेतलेल्या धान पिकाला अधिक किडींच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागते. याशिवाय डीएसआर पद्धतीत शेतकऱ्यांना तण नियंत्रण करणे देखील खूप अवघड जाते. अहवालातील 89 टक्के शेतकऱ्यांनी डीएसआर पद्धतीत तणांची वाढ अधिक होत असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे धान उत्पादनाला त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!