Paddy Farming : धानाच्या अनेक प्रजाती लुप्त; देशात केवळ 430 प्रजातींद्वारे धान शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) देशात मोठ्या प्रमाणात धान खरेदी (Paddy Farming) केली जाते. मात्र एफसीआयकडून खरेदी केल्या जाणाऱ्या धानाच्या वाणांचीच शेतकऱ्यांकडून शेती केली जात आहे. देशातील ग्राहकांची गरज भागवण्यासाठी काही निवडक जातीची लागवड सध्या देशात होत आहे. देशात स्वात्रंत्र्यापूर्वीच्या काळात जवळपास 15000 प्रजातींच्या माध्यमातून धान शेती केली जात होती. परंतु सध्यस्थितीत शेतकऱ्यांकडून देशपातळीवर केवळ 430 प्रजातीच्या धानाची लागवड केली जात आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता देशातील अनेक धानाच्या प्रजाती (Paddy Farming) लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने देशातंर्गत तांदळाचे (Paddy Farming) दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आहे. असे असतानाही देशात तांदळाची कमतरता जाणवत आहे. तांदळाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडूनही भारतीय महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या प्रजातींचीच लागवड केली जात आहे. परिणामी देशातील धानाच्या अनेक प्रजाती मागील काही काळापासून लुप्त झाल्या आहेत. यामागील सर्वात मोठे कारण हे सरकारी खरेदीच्या माध्यमातून केवळ काही मर्यादित जातींची धान खरेदी होत असल्याचे बोलले जात आहे.

नगदी रकमेसाठी शेतकऱ्यांचा ओढा (Paddy Farming In India)

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, देशातील धान उत्पादक शेतकरी सध्या त्याच जातींची लागवड करत आहेत. ज्या जातींची खरेदी ही भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) केली जात आहे. शेतकरी हे एफसीआयला विक्री करण्यासाठी आणि नगदी रक्कम मिळवण्यासाठी या मार्गाने जात आहेत. यावर्षीच्या 52 दशलक्ष धान खरेदीपैकी आतापर्यत 14 टक्के धान खरेदी ही पूर्ण होऊ शकली आहे. यामागील कारणही केवळ मर्यादित जातींची खरेदी होत असल्याचे मानले जात आहे.

अडचण नेमकी काय?

उपलब्ध माहितीनुसार व्यापारी भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) धान खरेदी करण्यास अनुत्सुक आहेत. कारण एफसीआयकडून धान खरेदी केल्यास व्यापाऱ्यांना अतिरिक्त खर्च येतो. याशिवाय एफसीआयकडून खरेदी केलेल्या धानामध्ये गुणवत्ता खराब असलेल्या काही धानाचीही समावेश असतो. अशी ओरड व्यापाऱ्यांकडून होत असल्याने एफसीआयच्या धानाला मागणी नसते. परिणामी एफसीआयकडून काही मर्यादित आणि गुणवत्तापूर्ण प्रजातीच्याच धानाचीच खरेदी केली जाते. परिणामस्वरूप शेतकऱ्यांकडून देखील काही निवडक प्रजातींचीच लागवड होत आहे.

error: Content is protected !!