Paddy Production : महापुराचे संकट आले… पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसासह महापुरामुळे पंजाबमधील धान पिकाला मोठा (Paddy Production) फटका बसला होता. मात्र असे असूनही यावर्षी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Production) होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख धान उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा जवळपास 205 लाख टन धानाचे उत्पादन होण्याचे संकेत मिळाले आहे. पंजाबच्या कृषी मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पंजाबमध्ये धान लागवडीच्या क्षेत्रात (Paddy Production) विशेष बदल दिसून आला नाही. मात्र यावर्षी पंजाबमध्ये धानाच्या प्रति हेक्टरी उत्पादनात मोठी वाढ होऊन, ते मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी 4 क्विंटल प्रति हेक्टरने अधिक नोंदवले गेले आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर महापुराचा फटका बसूनही यावर्षी धानाचे विक्रमी 205 लाख टन उत्पादन होणार असल्याचे पंजाबच्या कृषिमंत्रालायाने म्हटले आहे.

हेक्टरी उत्पादनात मोठी वाढ (Paddy Production In Punjab)

दरम्यान, 2022-23 या मागील वर्षीच्या हंगामातही पंजाबमध्ये 205 लाख टन धान उत्पादन झाले होते. तर 2020-21 मध्ये ते 208 लाख टन इतके विक्रमी नोंदवले गेले होते. यावर्षी पंजाबमध्ये धान काढणीच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने हे विक्रमी 205 लाख टन उत्पादन होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. यावर्षी पंजाबमध्ये हेक्टरी उत्पादन हे 69.39 क्विंटल नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत प्रति हेक्टरी 4.60 क्विंटलने अधिक आहे.

यावर्षी जुलै महिन्यात पंजाबमध्ये झालेल्या पावसामुळे महापुरात धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. पंजाबमध्ये जवळपास एक लाखाहून अधिक क्षेत्रावर धान पिकाची दुबार पेरणी करण्यात आली होती.

error: Content is protected !!