Paddy Purchase : शेतकऱ्यांकडून 1 लाख 30 हजार कोटींची धान खरेदी; केंद्र सरकारची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात देशभरात आतापर्यंत जवळपास 600 लाख टन धानाची सरकारी खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. या सरकारी धान खरेदीचा देशातील 75 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला असून, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे हमीभावाने एकूण 1 लाख 30 हजार कोटी रुपये सरकारकडून वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये धानाची सरकारी खरेदी (Paddy Purchase) सुरु करण्यात आली होती. अत्यंत कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

गहू खरेदी लवकरच(Paddy Purchase 1 Lakh 30 Thousand Crore)

उपलब्ध माहितीनुसार, अन्न सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेअंतर्गत देशभरातील नागरिकांना रेशनमार्फत एका वर्षाच्या कालावधीसाठी जवळपास 400 लाख टन तांदळाची आवश्यकता असते. मात्र सध्यस्थितीत केंद्र सरकारच्या राखीव साठ्यामध्ये जवळपास 525 लाख टन तांदूळ उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात तांदळाचे दर कमी होण्याची अपेक्षा सरकारकडून केली जात आहे. अशातच आता गहू काढणी हंगाम जवळ आला असून, आगामी महिनाभरात देशातील बाजार समित्यांमध्ये नवीन आवक होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता धान खरेदीनंतर केंद्र सरकारकडून हमीभावाने सरकारी गहू खरेदीच्या योजनेवर काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मार्च २०२४ मध्ये गव्हाची खरेदी सरकारकडून सुरु होण्याची शक्यता आहे.

सरकारी तांदूळ विक्री

दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या सरकारच्या अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाने माहिती जारी केली आहे की स्वस्त डाळ आणि गहू पिठानंतर आता सरकारकडून खुल्या बाजारात स्वस्त तांदळाचीही विक्री केली जाणार आहे. ही तांदूळ विक्री प्रति किलो २९ रुपये दराने सर्वसामान्यांसाठी, 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे सरकारकडून ग्राहकांना ५ आणि १० किलोच्या पॅकिंगमध्ये हा तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. ‘भारत तांदूळ’ या नावाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सरकारचा तांदूळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे गहू व्यापाऱ्यांप्रमाणे तांदूळ व्यापाऱ्यांना देखील प्रत्येक शुक्रवारी आपल्याकडील तांदूळ साठ्याची माहिती केंद्र सरकारला देणे बंधनकारक असणार आहे.

error: Content is protected !!