हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा विपणन महासंघाकडून जाहीर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात राज्य सरकारकडून 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) उभारण्यात आली असून, त्यापैकी 114 केंद्रांवर सध्या धान खरेदी सुरु आहे. याद्वारे आतापर्यंत 2 लाख 56 हजार 527 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक धानाची विक्री करता यावी, यासाठी खरेदी नोंदणीची मुदत 30 नोव्हेंबरहुन 31 डिसेंबरपर्यंत वाढण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 31 जानेवारी 2024 पर्यंत आपल्या दहा धानाची विक्री करता येणार आहे. असेही जिल्हा विपणन महासंघाने म्हटले आहे.
नोंदणीस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ (Paddy Purchase In Maharashtra)
दरवर्षी जिल्ह्यामध्ये गैर-आदिवासी भागामध्ये विपणन महासंघाकडून तर आदिवासी भागामध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केली जाते. यावर्षी सामान्य प्रतीच्या धानाला सरासरी 2183 रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आला आहे. धान खरेदीसाठी आतापर्यंत 83 हजार 131 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवात देण्यात आली आहे. अशी माहिती विपणन महासंघाकडून देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला राज्याचे राईस हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. 2021-22 मध्ये राज्यात 26 जुनपर्यंत एकूण 15.91 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली होती. तर 2021 मध्ये राज्यातील धान खरेदीचा आकडा 18.99 लाख टनांपर्यंत पोहचला होता. असेही जिल्हा विपणन महासंघाने म्हटले आहे.