Paddy Seeds : सरकार स्वस्तात देतंय ‘पूसा बासमती 1692’ तांदळाचे बियाणे; पहा.. कसे मिळवाल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात धान पिकाची (Paddy Seeds) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात धान पिकाचे योगदान मोठे आहे. धान हे खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवशक्यता असते. काही भागांमध्ये खरीप हंगामासाठी धानाची रोपे तयार करण्यासाठी मोठी लगबग असते. त्यामुळे आता तुम्हांला देखील खात्रीशीर धानाचे बियाणे मिळवण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (NSC) देशभरातील शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर ऑनलाईन धान बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील घरबसल्या ‘पूसा बासमती 1692’ या वाणाचे बियाणे (Paddy Seeds) मागवू शकतात.

कुठे मिळणार बियाणे? (Paddy Seeds Pusa Basmati 1692 For Farmers)

राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (National Seeds Corporation) शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ऑनलाईन पद्धतीने धान बियाणे (Paddy Seeds) उपलब्ध करून दिले जात आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या https://www.mystore.in/en/product/mustard-rh-761-certified-seed-2-kg-bag या संकेतस्थळावर जाऊन हे बियाणे तुम्ही मागवू शकतात. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून भाजीपाल्यासह सर्व प्रकरचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

‘पूसा बासमती 1692’ वाणाची खासियत

‘पूसा बासमती 1692’ हे वाण (Paddy Seeds) राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे खात्रीशीर बियाणे असून, ते लवकर काढणीला येते. साधारणपणे हे वाण 110 ते 115 दिवसांमध्ये काढणीला येते. या वाणाच्या तांदळाचे दाणे हे अधिक आकर्षक आणि लांब असतात. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते काढणीला आल्यानंतर, उभ्या पिकाचे दाणे झडत नाहीत. या वाणाला छान सुंगध असल्याने, ग्राहकांकडून त्याला अधिक मागणी असते.

त्यामुळे आता तुम्ही देखील आगामी खरीप हंगामासाठी खात्रीशीर बियाणे खरेदी करू इच्छित असाल. तर पूसा बासमती 1692 हे वाण तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. या वाणाची 10 किलोची पिशवी, 33 टक्के सूट देण्यासह 800 रुपयांमध्ये राष्ट्रीय बियाणे महामंडळाने ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या हे बियाणे मागवू शकतात. भारतातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिसा, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते.

error: Content is protected !!