Paddy Variety : कमी पाण्यात येणारे धानाचे 12 नवीन वाण विकसित; थेट पेरणी होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात धान उत्पादक (Paddy Variety) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान या पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र, आता बंगळुरू येथील एका नामांकित कंपनीने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या 12 प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे धानाच्या या सर्व पद्धतीने रोपे तयार न करता, थेट पेरणी करून लागवड करता येणार आहे. हवामान बदलामुळे सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होत आहे. ज्यामुळे अधिक पाण्याची गरज लागणाऱ्या प्रजातींऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या धान प्रजातींची (Paddy Variety) गरज निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन कंपनीने, या वाणांची निर्मिती केली आहे.

7 वर्षांपासून होते काम सुरु (Paddy Variety 12 New Developed)

किसानक्राफ्ट कंपनीचे अध्यक्ष रवींद्र अग्रवाल यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, कंपनीने 2017 मध्ये धानाच्या थेट पेरणी पद्धतीने केल्या जाणाऱ्या वाणांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले. त्यानुसार नवीन 12 डीएसआर वाणांच्या निर्मितीसाठी देशभरातील 175 धान प्रजातींचा (Paddy Variety) अभ्यास कंपनीने केला. त्यानंतर आपली नवीन 12 वाण विकसित केले असून, त्यांची चाचणी करण्यात आली आहे. हे सर्व वाण कमी पाण्यात अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे.

14 राज्यांमध्ये होणार चाचणी

रवींद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे की, येत्या खरीप हंगामात देशातील 14 प्रमुख राज्यांमध्ये या धानाच्या वाणांची (Paddy Variety) चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर या सर्व वाणांचे बियाणे वर्ष 2025 पासून बाजारात उतरवण्याचे लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे. कंपनीचे सर्व डीएसआर वाण बारीक दाणे, मध्यम आणि टपोऱ्या दाण्यांचे मिश्रण आहे. या सर्व वाणांचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त मिळते. कंपनीने तयार केलेल्या धानाच्या या सर्व प्रजाती अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातीं इतक्याच सक्षम आहे. ज्या एकरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन मिळवून देऊ शकतात.

बियाणे निर्मितीत डंका

किसानक्राफ्ट ही कंपनी बियाणे निर्मितीसह शेतीसाठीच्या अवजारे आणि कृषी उपकरणांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही काळामध्ये कंपनीने बियाणे संशोधन आणि विकासात आपले उल्लेखनीय काम केले आहे. अशातच आता कंपनीने कमी पाण्यात येणाऱ्या 12 नवीन प्रजातींची निर्मिती करत, बियाणे निर्मिती उद्योगामध्ये आपला डंका निर्माण केला आहे.

error: Content is protected !!