Paddy Variety : धानाचे नवीन वाण विकसित; जमिनीतील खारपटपणास आहे सहनशील!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात तांदूळ हे प्रमुख अन्नधान्य पीक असून, देशात सर्वाधिक धान पिकाखालीखालील (Paddy Variety) लागवड क्षेत्र आहे. विशेषतः खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन देखील मिळते. अशातच आता कृषी संशोधकांनी धान पिकाचे नवीन वाण शोधले आहे. जे अधिक खारपोटी जमीन असलेल्या शेतीमध्ये अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. त्यामुळे आता देशातील खारपट जमिनीत शेतकऱ्यांना धान पिकातून (Paddy Variety) अधिक उत्पादन मिळवण्यास मदत होणार आहे.

खारपटपणास आहे सहनशील (Paddy Variety Tolerant Of Soil Salinity)

देशात प्रामुख्याने विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार धान पिकाची (Paddy Variety) लागवड केली जाते. पुदुचेरी येथील कराईकलच्या कृषी संशोधन संस्थेने अशीच हवामान अनुकूल आणि भौगोलिक परिस्थिती अनुकूल धानाची प्रजाती विकसित केली आहे. प्रामुख्याने काही मातीमध्ये खारपटपणा अधिक आढळतो. अशावेळी हा खारपटपणा सहन करण्याची क्षमता पिकामध्ये जनुकीयदृष्टया असावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन कराईकल येथील पंडित जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ एग्रीकल्चर अँड रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी हे नवीन धान वाण विकसित केले आहे.

काय आहे वाणाचे नाव?

केकेएल (आर) असे नाव या धानाच्या वाणाला देण्यात आले आहे. हे वाण विकसित करताना संशोधकांनी खारपट जमीन आणि सामान्य जमीन डोळ्यासमोर ठेवून त्याची निर्मिती केली आहे. परिणामी या वाणामुळे सर्वच शेतकऱ्यांना लागवडीसाठी फायदा होणार आहे. सामान्यपणे भारतात सर्व भागांमध्ये शेतीमध्ये वेगवेगळ्या वातावरणानुरूप सर्व पिकांचे बियाणे वापरले जाते. प्रामुख्याने धान शेती करताना गोड्या पाण्याची आवश्यकता असते. मातीमध्ये खारपटपणा अधिक असेल तर धान पिकाचे उत्पादन योग्य मिळत नाही. ज्यामुळे धानाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे खारटपणास सहनशील अशा या वाणाची संशोधकांनी निर्मिती केली आहे.

दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये क्षारपड जमिनी किंवा खारपटपणा असलेल्या जमिनी अधिक आहे. त्यामुळे धानाचे कमी उत्पादन मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या वाणाच्या संशोधनामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. लवकरच हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पंडित जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ एग्रीकल्चर अँड रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!