Paddy Variety : चोरटा पाकिस्तान; भारतीय तांदूळ प्रजातींचे नाव बदलून करतोय शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाकिस्तान भारतीय बासमती तांदळाच्या जवळपास 6 प्रजातींची (Paddy Variety) चोरी करून, अवैधरित्या शेती आणि विक्री करत आहे. सहा भारतीय तांदळाच्या प्रजातींची नावे बदलून, पाकिस्तानात शेती केली जात आहे. ज्यामुळे भविष्यात भारतीय तांदूळ निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रजातींची निर्मिती करणाऱ्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच याबाबत पाकिस्तानी फर्म्सवर कारवाई (Paddy Variety) करण्याची मागणी वैज्ञानिकांनी केली आहे.

शेतकरी, निर्यातदारांचे नुकसान (Paddy Variety Indian Rice Species)

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी भारतातील आघाडीच्या बासमती तांदळाच्या अनेक प्रजातीची (Paddy Variety) पाकिस्तानात होत असलेल्या अवैध शेतीबाबत वैज्ञानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वैज्ञानिक ए. के. सिंह यांनी पाकिस्तानी बियाणे फर्म्सवर कारवाई सुरु करण्याची मागणी केली आहे. देशातील बासमती तांदूळ उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांचे हित लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कोणत्या प्रजातीची चोरी

भारतीय बासमती तांदळाच्या पूसा बासमती-1121 या वाणाचे (Paddy Variety) नाव बदलून ‘पीके 1121 कायनात’, पूसा बासमती PB-6 (PB-6), पीबी-1509 (PB-1509), पूसा बासमती-1121 (PB-1121), ‘पीके 1121 एरोमैटिक’, ‘1121 कायनात’ अशा सहा वाणाच्या माध्यमातून पाकिस्तान भारतीय तांदळाची शेती आणि बियाणे विक्री करत आहे. विशेष म्हणजे गूगल सर्चच्या माध्यमातून ही बाब भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांच्या लक्षात आली आहे. यामध्ये कराची स्थित लीला फूड्स आणि लाहोरच्या लतीफ राइस मिल्स (प्राइवेट) लिमिटेडच्या माध्यमातून भारतीय बासमती तांदळाच्या प्रजातीच्या बियाण्यांची विक्री सुरु असल्याचे वैज्ञानिकांनी समोर आणले आहे.

7 प्रांतांमध्ये अवैध शेती

भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वैज्ञानिक ए. के. सिंह यांनी म्हटले आहे की, आपल्या देशात विकसित करण्यात आलेल्या बासमती तांदळाच्या प्रजाती पाकिस्तानातील जवळपास उत्तरेकडील 7 प्रांतांमध्ये शेती करताना आढळून येत आहे. या सर्व प्रजाती बियाणे अधिनियम 1966 मध्ये संदर्भित करण्यात आल्या आहे. हा अधिनियम केवळ भारतीय शेतकऱ्यांना या वाणाचे बियाणे पेरणीसाठी परवानगी देतो. त्यामुळे अन्य कोणीही या बियाण्याच्या वापर करून शेती करत असेल तर कायद्याने उल्लंघन ठरते. त्यामुळे या कायदयाचा आधार घेऊन पाकिस्तानी फर्मेंवर अवैधरित्या शेतीला कारण्याबाबत करावी व्हावी ,जेणेकरून भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!