Paddy Variety : धानाचे ‘पीआर-126’ हे नवीन वाण विकसित; लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची (Paddy Variety) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या दोन महिन्यात राज्यात खरीप हंगाम सुरु होणार असून, शेतकरी धान लागवडीसाठी बियाणे खरेदीसाठी लगबग करण्यास सुरुवात होणार आहे. कारण शेतकऱ्यांना धान लागवडीसाठी आधीच रोपे तयार करावी लागतात. त्यामुळे आता तुम्ही देखील एखाद्या नामांकित धान वाणाच्या शोधात असाल तर आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेने उत्पादित केलेले ‘पीआर-126’ हे वाण (Paddy Variety) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. या प्रजातीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची थेट पेरणी केल्यास, मिथेन वायूचे उत्सर्जन कमी होते. याशिवाय धान पिकाला युरियाचा वापर खूपच कमी प्रमाणात होतो.

लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार (Paddy Variety For Farmers)

आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. अजय कोहली यांनी नुकतीच देशातील काही धान उत्पादक भागांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या वाणाच्या लागवडीबद्दल (Paddy Variety) शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. मागील काही वर्षांमध्ये या प्रजातीच्या धानाची चाचणी कंबोडिया या देशामध्ये करण्यात आली आहे. तर भारतातील पंजाब या राज्यात या वाणाची चाचणी घेण्यात आली आहे. पुढील वर्षभरात हे वाण सर्वच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहेत या वाणाची वैशिष्ट्ये

भारतात धानाच्या अनेक प्रजाती असल्या तरी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेने तयार केलेली ही प्रजाती इतरांपेक्षा वेगळी ठरत असल्याचे कोहली यांनी म्हटले आहे. या प्रजातीला पीआर – 126 असे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीच्या आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे की, तिचे उत्पादन १२० दिवसांत तयार होते, तर इतर प्रजातींचे उत्पादन 135 ते 150 दिवसांत काढणीला येते. या प्रजातीला कमी पाणी लागते. 2020 पासून व्हिएतनाम आणि कंबोडियामध्ये या प्रजातीवर संशोधन सुरू होते. 2023 मध्ये संशोधकांच्या हे वाण विकसित करण्यात यश मिळाले आहे. भारतात धानाच्या 40 प्रकारच्या प्रजातींवर (Paddy Variety) प्रयोग केले जात आहेत. धानाच्या या जातीमुळे उत्पादन तर वाढेलच शिवाय पाण्याचीही मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.

कसा असतो या वाणाचा तांदूळ?

मधुमेहाच्या रुग्णांना भात खाण्यास मनाई केलेली असते. डॉक्टर त्यांना सल्ला देतात की, भात खाल्ल्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल. हीच बाब लक्षात घेऊन हे खास वाण तयार केले आहे. या वाणाचे बियाणे वर्षभरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोहली यांनी सांगितले की, “या वाणाच्या धानातील प्रथिने वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बांगलादेशात 40 टक्के प्रथिनांची गरज या वाणाच्या मदतीने पूर्ण केली जाते. भारतात सध्या 7 ते 8 टक्के प्रथिने असलेल्या तांदळाच्या जाती प्रचलित आहे. त्यात लवकरच 14 ते 15 टक्के वाढ करण्याची तयारी सुरू आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!