Paddy Variety : धानाचे ‘स्वर्ण सब वन’ वाण; अतिवृष्टीत 17 दिवस पाण्यात तग धरून राहते!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Variety) घेतले जाते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि झारखंड ही आघाडीची धान उत्पादक राज्य आहेत. शेतकरी बऱ्याच भागांमध्ये एप्रिल-मे महिन्यापासूनच भाताची रोपे तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये धानाची रोपे तयार करण्यासाठी बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड करणे, खूप गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण धानाच्या ‘स्वर्ण सब वन’ या पाणी साचून राहणाऱ्या जमिनीसाठीच्या वाणाबद्दल (Paddy Variety) जाणून घेणार आहोत.

काय आहे ‘या’ वाणाची वैशिष्ट्ये? (Paddy Variety Swarna Sub 1)

धानाचे ‘स्वर्ण सब वन’ वाण (Paddy Variety) हे महापुरामुळे जमिनीत पाणी साचून राहणाऱ्या जमिनीसाठी तयार करण्यात आले आहे. जमिनीमध्ये 14 ते 17 दिवस पाणी साचून राहिल्यासही तग धरून राहते. त्यामुळे पाणी राहणाऱ्या जमिनीसाठी हे वाण अत्यंत प्रभावी मानण्यात आले आहे. आंध्रप्रदेशातील एका नामांकित कृषी विद्यापीठाकडून हे वाण विकसित करण्यात आले आहे. ‘स्वर्ण सब वन’ हे वाण लागवडीनंतर 140 दिवसांत परिपक्व होते. या जातीचा तांदूळ हा मध्यम पातळ असतो. वाणापासून शेतकऱ्यांना 66.5 टक्केपर्यंत तांदूळ मिळतो. विशेष म्हणजे महापूर येणाऱ्या भागांमध्ये या वाणापासून सामान्य वाणाच्या तुलनेत 1 ते 2 टन प्रति हेक्टर अधिक उत्पादन मिळते.

अतिपावसाच्या प्रदेशासाठी शिफारस

महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात पावसाळ्यात अधिक पाऊस पडतो. त्यामुळे अशावेळी हे ‘स्वर्ण सब वन’ वाण अति पावसाच्या प्रदेशासाठी 2009 पासून अधिसूचित करण्यात आले आहे. या वाणाची निर्मिती करताना संशोधकांनी स्वर्ण या लोकप्रिय मेगा जातीच्या जनुकीय पार्श्वभूमीत सब-1 जनुक (सबमर्जन्स टॉलरन्स जीन) समाविष्ट केले आहे. ज्यामुळे हे वाण दोन आठवड्यापर्यंत पाण्यात पूर्ण बुडणे सहन करू शकते. त्यामुळे कोकणातील किनारी भागात किंवा मग भंडारा, गोंदिया या जिल्ह्याच्या भागांमध्ये सततच्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे पाण्याच्या साचून राहण्याच्या समस्येबाबत शेतकऱ्यांना हे वाण उपयुक्त ठरू शकते. याचा रंग स्वर्णापेक्षा उजळ आहे आणि मध्यम पातळ धान्ये 5.0-5.5 टन/हेक्टर सरासरी उत्पादकता देतात. यात सर्व प्रमुख रोग आणि कीटकांविरूद्ध शेतातील सहनशीलता आहे.

error: Content is protected !!