Palak Cultivation : ‘ऑल ग्रीन’ वाणाद्वारे उन्हाळी पालक लागवड; लग्नसराईत मिळेल बक्कळ नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात भाजीपाला लागवड (Palak Cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे लागवडीनंतर खूपच कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस येतो. इतकेच नाही तर लगेच ताजा पैसा देखील मिळतो. ज्यामुळे अधिक शेतकरी भाजीपाला लागवडीला महत्व देतात. अशातच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून, सध्याच्या घडीला अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे वावर मोकळे होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल आणि अन्य स्तोत्रांद्वारे काही प्रमाणात पाणी उपलब्ध असेल. तर अशा शेतकऱ्यांनी ‘ऑल ग्रीन’ वाणाच्या पालक भाजीची लागवड (Palak Cultivation) केल्यास, त्यांना कमी कालावधीमध्ये उन्हाळाच्या दिवसांमध्ये अधिक दर मिळून मोठा फायदा होऊ शकतो.

मिळवा घरपोच बियाणे (Palak Cultivation In Summer Season)

भारतीय बियाणे महामंळाकडून ‘ऑल ग्रीन’ वाणाच्या पालक भाजीचे (Palak Cultivation) बियाणे हे घरपोच उपलब्ध करून दिले जाते. या बियाण्याची किंमत एका 500 ग्रॅम पाऊचसाठी 65 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. शेतकरी प्रामुख्याने राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (https://www.mystore.in/en/product/crop-nsc-palak-vareity-all-green-500gm) संकेतस्थळावर जाणून हे बियाणे मागवू शकतात. ‘ऑल ग्रीन’ हे पालक वाण सर्व वाणांमध्ये अधिक उत्पादन मिळवून देण्यास मदत करते.

‘ऑल ग्रीन’ वाणाचे वैशिष्ट्ये

‘ऑल ग्रीन’ हे पालक भाजीचे वाण (Palak Cultivation) अधिक उत्पादन देण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पालक लागवड प्रामुख्याने हिवाळ्यात अधिक केली जाते. मात्र, तुम्ही अत्याधुनिक सुविधांचा वापर करून, या पालक भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवू शकतात. या प्रजातीचे रोपे ही एकसमान आणि हिरवीगार असतात. विशेष म्हणजे ही प्रजाती केवळ 35 ते 40 दिवसांमध्ये काढणीला येते. त्यानंतर प्रामुख्याने 20 ते 30 दिवसांच्या अंतराने या वाणाच्या भाजीची कापणी केली जाऊ शकते. अर्थात एकदा लागवड केल्यानंतर जवळपास 6 ते 7 वेळा या भाजीची कापणी केली जाऊ शकते.

पालक भाजीचे आहारातील महत्व

पालक भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. ज्यामुळे तिला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. परिणामी आता तुम्ही देखील पाणी असेल तर उन्हाळाच्या हंगामामध्ये पालक लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात. विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचा सिझन असल्याने पालक-पनीर, पालक बटाटा असा मेनू पाहायला मिळतो. त्यामुळे उन्हाळाच्या दिवसांमध्ये तुम्ही या भाजीच्या लागवडीतून चांगली कमाईची संधी साधू शकतात.

error: Content is protected !!