Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांनी सांगितला नवीन हवामान अंदाज; मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १४ तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अशी की दि. १६ ते २० सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यांमध्ये १३ सप्टेंबर पासूनच पाऊस सुरू होणार आहे.

१३ तारखेला विदर्भात पाऊस येणार आहे तर १४ तारखेला पश्चिम विदर्भात पाऊस येणार आहे आणि १५ सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस येणार आहे. त्यानंतर दि. १६ सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. दि. १६ ते २० सप्टेंबर यादरम्यान पडणाऱ्या पावसाने कोणताही भाग वंचित राहणार नाही. अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यास शेतकऱ्यांना त्यासंबंधी संदेश दिला जाईल.

मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार?

मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार आहे कारण जायकवाडीच्या दिशेने बारा तासात २ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गेल्या २४ तासात नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने उसंत घेतले असले तरी मुसळधार पावसाचा इशारा (यलो) हवामान विभागाने दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे भीमा नदीमध्ये आठ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात पाऊस असून आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!