Panjabrao Dakh Havaman Andaj : 14 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कसं असेल हवामान? पंजाबराव डख यांनी वर्तवला नवा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच २५ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला थंडीची लाट अनुभवायला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर आपल्याला थंडीचा अनुभव घेता येणार आहे. येव्हडच नव्हे तर थंडीच्या या दिवसात तुम्ही सुट्ट्यांचा प्लॅन करून निसर्गरम्य ठिकाणी फिरायलाही जाऊ शकता.

पंजाबराव डख यांचा नेमका हवामान अंदाज काय? Panjabrao Dakh Havaman Andaj

१३ नोव्हेंबर पासून जवळपास १० ते १२ दिवस म्हणजेच २५ नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. देशाच्या उत्तरेच्या भागात जोरदार वार असल्यामुळे २५ नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात आपल्याला थंडीची लाट पाहायला मिळेल. आता इथून पुढे पावसाची कोणतीही शक्यता नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गव्हाची किंवा हरभऱ्याची पेरणी केलेली आहे त्यांनी आपल्या पिकांना पाणी देण्यासही कोणतीही हरकत आता नाही. असे पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी सांगितलं आहे.

शेतकरी मित्रानो, तुमच्या गावात नेमकं वातावरण कस असेल? पाऊस कधी पडणार? कोरड हवामान कधी असेल याची अचूक माहिती घ्यायची असेल; तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला सलग ४ दिवसांचा हवामान अंदाज अगदी अचूकपणे समजेल. याशिवाय, सातबारा उतारा, जमीन मोजणी, सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव, पशु- खरेदी विक्री, सर्व सरकारी योजनांना थेट अर्ज यासारख्या असंख्य सुविधा तुम्हाला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पाऊस अजिबात पडणार नसून हळूहळू राज्यात थंडीचा जोर वाढेल. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेण्यासाठी आवर्जून पाणी पाजावे असेही त्यांनी सांगितलं आहे. एकूण काय तर रब्बी हंगामातील पिकांना पोषक हवामान तयार होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

error: Content is protected !!