Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात पुढच्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस, तलाव भरणार!! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : सध्या शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांच्या नजर अवकाशाकडे लागल्या आहेत. राज्याच्या बऱ्याच भागात ढगाळ स्वरूपाचे वातावरण आहे. त्यामुळे लवकरच पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत तर काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे त्यामुळे शेतकरी राजा संकटात आहे. यापार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. यानुसार १८ जुलैपासून २१ जुलै पर्यंत महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.

पंजाबराव डंख यांनी कोणकोणत्या भागात पाऊस होणार असे सांगितले?

पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात आज १६ जुलै पासून पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच १८,१९,२०,२१ जुलै रोजी पूर्व, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा अशा भागात जोरदार पाऊस होणार आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकऱ्यांनो तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये कधी पाऊस पडणार याची माहिती जाणून घ्यायची असे तर आत्ताच प्ले स्टोअरवर जाऊन आमचे Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला अगदी मोफत रोजच्या हवामान अंदाजाविषयी माहिती मिळेल. त्याचबरोबर, रोजचे ताजे बाजारभाव, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री या बाबतची सर्व माहिती मिळेल.

पश्चिम महाराष्ट्रात कमी पाऊस? Panjabrao Dakh Havaman Andaj

१८ जुलै ते २१ जुलै या कालावधीत विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशमधे चांगला पाऊस होणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात कमी प्रमाणात पाऊस होईल असे डख यांनी सांगितले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत रिमझिम पाऊस पडेल. मात्र २४ जुलै नंतर पुन्हा मुसळधार पावसाळा सुरवात होईल असे सांगण्यात आले आहे.

https://youtu.be/FC0Cju2nY1s

पाणी साठ्यात होणार वाढ?

आता जुलै महिना अर्धा संपला तरी पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पाणीसाठ्याची काय होणार? तळी, धरणे केव्हा भरणार असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. मात्र १८ तारखेपासून सुरु होणाऱ्या पावसानंतर तळी, तलाव भरण्यास सुरवात होईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात २० जुलै नंतर तळी भरायला लागतील. तसेच खान्देशमधे मोठा पाऊस होऊन तलाव भरले जातील असे पंजाबराव डख यांनी सांगितले. Panjabrao Dakh Havaman Andaj

या संकटाच्या काळात हवामानाबाबत माहिती मिळवण्यासाठी अनेकजण पंजाब डख यांच्यावर विश्वास ठेवतात. पंजाब डख अचूक हवामान अंदाज सांगतात त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या हवामान अंदाजावर विश्वास शेतात. सध्या देखील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!