Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची शेती पिके पावसाअभावी जुळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. जर आगामी काळात पाऊस आला नाही तर खरीप पिके वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पाऊस कधी पडेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता पावसाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रविवारी म्हणजे तीन सप्टेंबर पासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांनी वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार 3 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांना मोठा फायदा होणार असल्याचे डख यांनी सांगितले आहे. तीन सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ निर्माण होणार आहे आणि या चक्रीवादळाचा फायदा महाराष्ट्राला होणार असून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
या ठिकाणी पडणार पाऊस
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण कीनारपट्टी, मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र या सर्व ठिकाणी 10 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची पिके सुकली आहेत मात्र सध्या पडणारा पाऊस हा शेतकऱ्यांच्या सुकलेल्या पिकासाठी जीवनदान ठरणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
दुष्काळ पडणार नाही – पंजाबराव डख
सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळ पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र राज्यांमध्ये दुष्काळ पडणार नाही असे स्पष्ट शब्दांमध्ये पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील यांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
या ठिकाणी पहा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो आता रोजचा हवामान अंदाज पाहणे अगदी सोपे झाले आहे. आम्ही तुमच्यासाठी एक खास ॲप बनवले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजच्या रोज घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून हवामान अंदाज चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सरकारी योजना, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, यासंबंधी ही सर्व माहिती या ॲपच्या माध्यमातून अगदी मोफत मिळू शकता. त्यामुळे लगेचच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.