Panjabrao Dakh Havaman Andaj : दिलासादायक ! राज्यात ‘या’ दिवशी हवामान कोरडे राहील; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन – राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपलं आहे. अशातच मे महिना आला तरीही अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. ता. ८,९,१० या दिवशी सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज आणि माळशिरस, कोल्हापूर , लातूर, कोकण भागातील रायगड, रत्नागिरी या भागात अवकाळी पाऊस राहणार आहे. यातील सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी अधिक पाऊस होणार आहे. १० मे पासून ते १६ मे पर्यंत तापमान कोरडे राहील. असा अंदाज हवामान अभ्यास पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी वर्तवला आहे.

१० मे पासून ते १६ मे पर्यंत अवकाळी पाऊस ब्रेक घेत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. मात्र या दिवसात हवामान कोरडे राहणार असल्याने काढणीला आलेली पिके शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढावी. भुईमूग, ज्वारी, कांदे हे पीक जर अजूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढले नसतील तर १० मे ते १६ मे पर्यंत काढून घ्यावे. तसेच कोरडे हवामान हे विवाह सोहळ्यासाठी सकारात्मक राहणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितलं आहे.

शेतकरी मित्रानो, सध्या वातावरणाचे काही खरं नाही, कधी ऊन, कधी सोसाट्याचा वारा आणि कधी कधी अवकाळी पाऊस.. कधी काय होईल हे समजतच नाही. परंतु चिंता करू नका. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला २ दिवस अगोदरच तुमच्या भागातील हवामानाचा अचूक अंदाज सांगितला जातोय. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च नाही. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीमध्ये याव्यतिरिक्त सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतमालाची थेट खरेदी – विक्री, सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या अनेक सुविधा मोफत मध्ये मिळत आहेत.

१० मे ते १६ मे या दिवसात लग्नसमारंभ

मे महिना हा लग्न समारंभाचा हंगाम आहे. या हंगामात अधिकाधिक विवाह सोहळे होतात. याच महिन्यातील १० मे ते १६ मे तारखे दरम्यान हवामान कोरडे राहणार असून विवाह सोहळ्यासाठी पाऊस, वादळी वारा, वीज यांची लग्नसोहळ्यासाठी अनुपस्थिती राहील. यामुळे विवाह सोहळा विना अडथळा पार पडेल. मात्र उन्हाचा चटका कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यायची आहे.

error: Content is protected !!