Papaya Farming : पपईच्या लागवडीतून बदलले नशीब, दोन एकरात मिळवले 10 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Papaya Farming | राज्यात इतर पिकांसोबत पपईचे (Papaya) देखील पीक घेतले जाते. पपईला वर्षभर बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.आरोग्याच्या दृष्टीने पपई खूप फायदेशीर असल्याने डॉक्टर रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला देतात. मागणी जास्त असल्यामुळे पपईचे भाव देखील जास्त असतात. त्यामुळे अनेक शेतकरी पपईची लागवड करून लाखोंचा नफा मिळवत आहेत. इतकेच नाही तर सरकार आता शेतकऱ्यांना पपई लागवडीवर अनुदान देखील देत आहे. (Agriculture News)

बेगुसराय जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पपई लागवडीतून खूप नफा मिळवला आहे. चेरिया बरीयारपूर परिसरात बढकुरवा येथे राहत असणारे शेतकरी नीरज सिंह यांनी पपईची लागवड करून एका वर्षात सहा लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यांना ही प्रेरणा न्यूज चॅनलवरील कार्यक्रमातून मिळाली आहे. त्याशिवाय त्यांना पपई लागवड करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी मदत झाली. ते एका पपईच्या झाडापासून साधारण ५० किलो पपईचे उत्पादन घेत आहेत. सध्या बाजारात ४० ते ५० रुपये किलोने पपई विकली जात आहे. (Marathi News)

त्यांनी दोन एकरमध्ये रेड लेडी जातीची पपई लागवड केली असुन ते सध्या काही झाडांपासून १०० किलोपर्यंत उत्पादन मिळवत आहेत. एका वर्षाला पपई तयार होते. अशाप्रकारे प्रत्येक वर्षी ते दहा लाख रुपयांची पपई विक्री करत आहेत. त्यात त्यांना एकूण चार लाख रुपये खर्च तर ६ लाख रुपये नफा मिळत आहे.

जर तुम्हालाही जास्त नफा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी पपई लागवड उत्तम पर्याय आहे. समजा तुम्ही एका एकर शेतात पपईची लागवड करत असाल तर तुम्हाला दोन लाख रुपये खर्च आणि तीन लाख रुपये नफा मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला राज्य सरकारकडून एकरी ४५ हजार रुपयांचे अनुदानही मिळेल.

error: Content is protected !!