Papaya Production : ही आहेत 6 प्रमुख पपई उत्पादक राज्य; वाचा.. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन (Papaya Production) घेतले जाते. याशिवाय भारतामध्ये सर्वच राज्यांमध्ये पपईची लागवड केली जाते. बाजारात फळांमध्ये पपईला नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे दरही चांगला मिळतो. मात्र, देशातील कोणत्या राज्यात पपईचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते? या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पपई उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? याशिवाय पहिल्या सहा राज्यांमध्ये एकूण किती पपईचे उत्पादन (Papaya Production) होते? याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आंध्रप्रदेश प्रथम स्थानी (Papaya Production In India)

उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच बाजारात मोठ्या प्रमाणात पपईची आवक होताना पाहायला मिळते. देशात प्रामुख्याने 26.17 टक्के उत्पादन मिळवत आंध्रप्रदेश हे राज्य पपई उत्पादनात (Papaya Production) पहिल्या क्रमांकावर आहे. आंध्रप्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करतात. ज्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते. तर पपईमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. पपईत प्रामुख्याने जीवनसत्वे ‘अ’ हे अधिक प्रमाणात असते.

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

देशातील एकूण फळांच्या उत्पादनामध्ये पपईचे महत्व हे अधिक प्रमाणात आहे. पपई ही पिकल्यानंतर आणि कच्चा अशी दोन्ही प्रकारे खाल्ली जाते. कच्च्या पपईची भाजी देखील केली जाते. देशातील एकूण पपई उत्पादनापैकी 19.29 टक्के उत्पादनासह गुजरात हे राज्य पपई उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर देशातील एकूण पपई उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात देशातील एकूण पपई उत्पादनापैकी 8.64 टक्के पपई उत्पादन होते.

सहा राज्यांमध्ये 85 टक्के उत्पादन

दरम्यान, देशातील एकूण पपई उत्पादनात कर्नाटक हे राज्य चौथ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी देशातील एकूण पपई उत्पादनापैकी 8.56 टक्के उत्पादन होते. पपई ही अनेक रोगांसाठी गुणकारी मानली जाते. प्रामुख्याने अपचनावर पपई सेवन रामबाण उपाय मानला जातो. तर देशातील एकूण पपई उत्पादनापैकी 8.51 टक्के उत्पादनासह मध्यप्रदेश हे राज्य पाचव्या, तर 6.61 टक्के उत्पादनासह छत्तीसगड हे राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. याशिवाय या सहा राज्यांमध्ये देशातील एकूण पपई उत्पादनापैकी 85 टक्के उत्पादन होते.

error: Content is protected !!