Parbhani Agri University : परभणी विद्यापीठाअंतर्गत चार नवीन संशोधन प्रकल्पांना मंजुरी; वाचा… जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी (Parbhani Agri University) एकूण चार नवीन संशोधन प्रकल्‍प मंजूर करण्यात आले आहे. या चारही प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून एकूण 21 कोटी 77 हजार इतक्या निधीस मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारकडून याबाबत एकूण चार जीआर जारी करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून विद्यापीठाच्या (Parbhani Agri University) विविध संशोधन आणि विस्तार केंद्राद्वारे संशोधनास आणखी बळ मिळणार आहे.

संशोधन कार्यास बळ मिळणार (Parbhani Agri University Research Projects)

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून (Parbhani Agri University) शेतकऱ्यासांठी विविध बाबींवर संशोधन केले जाते. सध्या विद्यापीठाचे संशोधने राष्ट्रीय पातळीवर गाजत असून, नुकतेच विद्यापीठाच्या सात वाणांना राष्ट्रीय पातळीवर मंजुरी मिळाली आहे. या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने विद्यापीठास संशोधनासाठी नवीन चार प्रकल्‍प मंजूर केले आहेत. ज्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्यास आणखी बळकटी मिळणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी म्हटले आहे.

एकूण चार प्रकल्पास मंजुरी

या चारही प्रकल्‍पांमध्ये नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक उत्पादनातील कीटकनाशकांचे अवशेष तपासणी प्रयोगशाळेकरिता 8 कोटी 63 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. शेतकरी सहभाग कृती संशोधन शाश्वत विकासासह लिंबूवर्गीय हरित व्यवस्थापन कार्यक्रमाकरिता 4 कोटी 93 लाख रुपयांची तरतुद केली आहे. तर 4 कोटी 28 लाख रुपयांची तरतुद प्रगत वनस्पती विश्लेषण प्रयोगशाळेची स्थापना आणि वनस्पती विश्लेषण आणि उती चाचणी द्वारे सामान्यतः उगवलेल्या पिकामध्ये पोषक तत्त्वांच्या कमतरतेचे निदान योजनेकरिता करण्यात आली आहे.

तर अन्य एका जीआरद्वारे 3 कोटी 15 लाख रुपयांची तरतुद शाश्वत आणि नैसर्गिक शेतीसाठी सूक्ष्मजीव आणि यांत्रिक उपायांचा वापर करून प्रवेगक कंपोझिटींगवर शेतकऱ्यांचा सहभागात्मक संशोधन केंद्र यासाठी करण्यात आली आहे. अशा या महत्वकांक्षी चारही संशोधन प्रकल्‍पाव्‍दारे शेतकऱ्यांच्या सहभागातून संशोधन कार्य होणार असुन, यामुळे गरजेवर आधारित संशोधन होईल. या संशोधनाचा मराठवाड्यातील शेती उद्योगास पाठबळ मिळून, मराठवाड्यातील शेती उद्योग शाश्वत होईल, अशी आशा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केली आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर :

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402231515175001.pdf

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402231525163001.pdf

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402261226132401.pdf

error: Content is protected !!