कोंबड्या आणि शेळीसाठीही मिळणार कर्ज, असा करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pashu Kisan Credit Card Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरकार वेगेवेगळ्या योजना राबवत असते. सरकारच्या या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देखील होतो. अशीच एक योजना म्हणजे ‘पशु किसान क्रेडिट कार्ट योजना’, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना पशु क्रेडिट कार्डवर हमीशिवाय 1,80,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे जे पशुपालनही करतात. या योजनेच्या मदतीने ते गाय, म्हैस, कोंबडी, बकरी खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.

Online अर्ज कसा करण्यासाठी इथे क्लिक करा

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – (Pashu Kisan Credit Card Yojana)

ज्या शेतकऱ्याला पशुसंवर्धनासाठी कर्ज घ्यायचे आहे, ते शेतकरीया योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून यासाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेतून एक फॉर्म आणावा लागेल आणि तो आवश्यक कागदपत्रांसह भरून सबमिट करावा लागेल. (Latest Marathi News)

यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल सांगायचे तर, यामध्ये जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, बँकेचा क्रेडिट स्कोअर/कर्ज इतिहास, अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाइल क्रमांक आणि पासपोर्ट आकार फोटो ही सर्व कागदपत्रे लागतात. Pashu Kisan Credit Card Yojana

अनुदान मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास एक गोष्ट मात्र करावीच लागेल. आजच Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे नाव सर्च करा. या ॲपमध्ये आपल्याला आवश्यक अशा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून अगदी क्षणार्धात एका क्लिकवर माहिती मिळवता येऊ शकते, तसेच ऑनलाईन अर्ज देखील या ॲपद्वारे करता येऊ शकतो. तसेच जमीन मोजणी, सात बारा, शेतकरी दुकान, नकाशा मोजणी, हवामान अंदाज आदी सेवांचा लाभ मिळवता येईल.

अत्यंत कमी दरात कर्ज उपलब्ध

या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात फक्त 4% व्याज द्यावे लागेल. जर तुम्ही खाजगी बँकांकडून पशुपालनासाठी कर्ज घेतले तर तुम्हाला ७% पर्यंत व्याज द्यावे लागेल.

कोणत्या जनावरांवर किती कर्ज मिळते?

या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्राण्यांवर वेगवेगळी रक्कम उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला गायीवर 40,000 हजारांपर्यंत कर्ज मिळते. म्हशीवर तुम्हाला 60000 हजारांपर्यंत कर्ज मिळते. दुसरीकडे, तुम्हाला मेंढ्या आणि शेळ्यांवर 4000 च्या वर कर्ज मिळते आणि कोंबड्यासाठी 700 रुपयांपेक्षा जास्त कर्ज मिळते. दुसरीकडे, जर एखाद्याला डुक्कर विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी त्याला 16000 रुपयांपेक्षा जास्त कर्ज मिळते.

error: Content is protected !!