पशुधन विमा योजना : मेंढ्यांचा 1 रुपयात विमा काढणार? अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पशुधन विमा योजना : शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळावा यासाठी तात्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक रुपया पिक विमा देण्याचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अब्दुल सत्तार धनगर समाजासाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेंढ्यांचा एक रुपयात विमा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. सिल्लोड या ठिकाणी राजव्यापी धनगर समाज निर्धार मेळाव्यात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पशुधन विमा काढण्यासाठी मोबाईल वरून अर्ज कसा करावा?

शेतकरी मित्रांनो सरकार आपल्या जनावरांवर विमा काढल्यास मोठी नुकसान भरपाई देते. मात्र यासाठी आपण वेळेवर आपल्याकडील जनावरांचा विमा काढणे गरजेचे आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या हे काम करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. या अँपवरून तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. तसेच तुम्ही येथून जनावरांची खरेदी विक्री कोणाही एजंटशिवाय करू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या गावाजवळील सर्व जनावरांच्या डॉक्टरांसोबत संपर्क करण्याची सुविधा या अँपवर देण्यात आली आहे. यासोबत रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी आदी बाबी तुम्हाला इथे मोफत देण्यात आल्या आहेत. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

पशुधन विमा काढणे आजची गरज

पशुधनाचा विमा म्हणजेच पशूंना होणारे आजार किंवा अपघात यामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी केला जातो (नुकसान भरपाई मिळावी). या दृष्टीकोनातून पशुधन विमा काढणे आजची गरज बनली आहे. पशू निरोगी आहे, ठराविक वयोगटातील आहे, त्याचे लसीकरण झाले आहे. तसेच पशूचे बाजारातील मूल्य लय आहे. इत्यादी गोष्टींची तपासणी पशूंच्या डॉक्टरांकडून घेऊन नंतरच गायींचा विमा उतरविला जातो. उदा. गायी, म्हशी खरेदी केल्यानंतर एक आठवड्याच्या आतच गायीचा विमा उतरविला गेला पाहिजे तरच नुकसान भरपाई मिळते. त्याकरीता खालील गोष्टींची पूर्तता करावी लागेल :

 • विमा कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे.
 • जनावरांचा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे व गायीचा विमा उतरवणे.
 • गायीचा विमा काढल्यानंतर गायीच्या कानावर खुणेचा बिल्ला लावला जातो.

(बिल्ला लावला म्हणजेच खऱ्या अर्थाने विमा उतरविला गेला आहे असे मानले जाते.) जर गाय, म्हशी, बैल यांच्यामध्ये संपूर्ण कायमची अपंगत्वता ही एक जास्त जोखीम घेता येते. दुभती जन्वारे किंवा उत्पादनाला पूर्णपणे अकार्यक्षम होणे किंवा बैल असल्यास काम करण्यास अपंग होणे हे धोके यामध्ये समाविष्ट आहेत.

पशूवयोगटवार्षिक प्रिमियम दर
दुभत्या गायी२ ते १० वर्षे४.०० %
दुभत्या म्हशी३ ते १२ वर्षे४.०० %
वळू३ ते ८ वर्षे४.०० %
बैल३ ते १२ वर्षे४.०० %
वरील १ ते ४ साठी (संपूर्ण कायमची अपंगत्वता ही जादा जोखीम घ्यावयाची असल्यास)वर्ष१.०० %
बकरी / मेंढी४ महिने ते ७ वर्षे४.०० %

टीप : पशुधन विम्याची पॉलिसी पाच वर्षापर्यंत दीर्घ मुदतीसाठी घेता येते.

दुदैवाने जर गाय आजारी होऊन मेली अथवा अपघातामध्ये मेली तर, खालील गोष्टींची खबरदारी घ्यावी.

 • गाय खरेदी केल्यापासून एक महिन्याच्या नंतर जर गाय आजारी झाली अथवा अपघातामध्ये मेली तरच नुकसान भरपाई मिळते. 
 • विमा कंपनी अधिकाऱ्यांना बोलविणे? दाखविणे (आजारी असल्यास विमा अधिकाऱ्यांना पूर्व कल्पना दयावी.)
 • गाय मेली असल्यास गायीचा बिल्ला असलेला कण कापून त्याची माहिती विमा कंपनी अधिकाऱ्यांना दयावी. 
 • डॉक्टरांकडून मृत्यूचा दाखला घ्यावा. (त्यावर मृत्यूचे कारण लिहिलेले असणे महत्त्वाचे आहे.)
 • विमा कंपनी अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाई अर्ज भरून घ्यावा. हा अर्ज विमा कंपनी अधिकाऱ्याकडेच असतो. 

खालील गोष्टींकरीता नुकसान भरपाई मिळू शकता नाही –

 • पशूला जाणूनबुजून केलेली इजा, जास्त बोजा टाकणे.
 • पॉलिसीच्या मुदतीपूर्वी झालेले आजार किंवा रोग.
 • चोरी किंवा गुप्तपणे विक्री.

अधिक माहितीकरिता जवळच्या विमा कंपनीशी संपर्क साधावा.

धनगर समाजाचे प्रश्न मांडणार

राज्यामध्ये धनगर समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन मुंबई येथे बैठक घेऊन धनगर समाजाचे प्रश्न मांडणार असल्याचे देखील सत्तार म्हणाले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड येथील धनगर मेळाव्यामध्ये बोलताना म्हणाले आहेत.

मेंढपाळांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर मेंढ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा मिळावा या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ घेऊन मुंबई या ठिकाणी बैठक घेऊ असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. त्याचबरोबर वन विभागाच्या जागेवर मेंढ्यांना चरण्यासाठी परवानगी मिळावी मेंढ्यांना विमा संरक्षण मिळावे. यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचा घेतला होता मोठा निर्णय

राज्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेकजणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याची कल्पना तात्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची होती आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी ती आमलात देखील आणली सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी एक रुपया पिक विम्याचा लाभ घेतला आहे. त्यानंतर आता त्यांनी मेंढ्यांचा एक रुपयात विमा करण्याचा प्रस्ताव सरकार समोर मांडणार असल्याचे देखील म्हटले आहे.

error: Content is protected !!