पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल ‘या’ दिवशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । नव्याने निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांचा समावेश करत २ वर्षांपासून रखडलेल्या पाथरी बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने २१ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, २७ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ३० एप्रिलला मतदान आणि निकाल लागणार आहे. पाथरी बाजार समितीत गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यंदा सत्तेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये चुरस पहायला मिळू शकते.

पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर राज्य शासनाने संचालक मंडळाला २ वेळा मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने या बाजार समिती वर प्रशासक नेमले होते. न्यायालयाने ३० एप्रिल पूर्वी बाजार समितीच्या निवडणूक घेण्यात याव्यात आणि नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा यात समावेश करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार १० फेब्रुवारी पासून सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. २० मार्च रोजी १८ सदस्यीय कृऊबा समितीची सुधारित अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून २१ मार्च रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

यानुसार २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर ५ एप्रिलला सर्व अर्जाची छाननी होईल. ६ एप्रिलला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ६ ते २० एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. २१ एप्रिलला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप होणार आहे. तर ३० एप्रिलला मतदान आणि निकाल लागणार आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणत्याही शेतमालाचा बाजारभाव चेक करायचा असेल तर आज Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. येथे तुम्हाला कोणत्याही पिकाचा महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभाव अगदी काही मिनिटात पाहता येणार आहे. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही. त्यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, पशु खरेदी -विक्री, सरकारी योजना, अशा शेतीशी निगडित सर्व सुविधा अगदी फुकटात दिल्या जातात. तसेच हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू शकता, त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

दरम्यान यावेळेस होणारी निवडणूक रंगतदार असण्याची शक्यता आहे. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यामुळे बाजार समिती पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी प्रयत्नशील आहेत. त्यांना सईद खान यांच्या नेतृत्वात लढणार असलेल्या शिवसेनेशी टक्कर द्यावी लागेल असं वाटत असतानाच राज्यातील महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटांच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठक होत मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. जरी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्याची शक्यता असली तरी तिरंगी लढतीचे चित्र समोर आले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

error: Content is protected !!