Cucumber Variety: वर्षातून चार वेळा उत्पन्न देणारी ‘पी.सी.यू.एच. काकडी’ जाणून घ्या माहिती  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा सुरू झालेला आहे आणि यावेळी काकडीची (Cucumber Variety) मागणी जोर धरते. सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या काकडीच्या जाती आहेत. पण आज आपण अशा काकडी बद्दल माहिती घेणार आहोत, जिची लागवड वर्षातून चार वेळा करता येते. या काकडीचे नाव आहे पी.सी.यू.एच.काकडी (PCUH Cucumber). जाणून घेऊ याविषयी अधिक माहिती.

पी.सी.यू.एच. काकडीची वैशिष्ट्ये (PCUH Cucumber Features)

या जातीची काकडी (Cucumber Variety) वर्षभर लागवडीसाठी उत्तम पर्याय असून या काकडीपासून उत्पन्न  सुद्धा चांगले मिळते. पेरणीनंतर काही दिवसांत ही जात काढणीला तयार होते, तसेच या जातीच्या काकडीचा लागवड खर्चही कमी आहे. काकडीच्या या जातीचे बियाणे बाजारात शेतकर्‍यांना सहज उपलब्ध आहे.

या काकडीच्या लागवडीसाठी योग्य प्रमाणात पाणी लागते. तणमुक्त शेतात आणि ठिबक सिंचन तंत्राचा वापर करून काकडीचे चांगले उत्पादन घेता येते.

पी.सी.यू.एच. काकडीची लागवड पद्धती Cultivation methods of PCUH Cucumber)

ही काकडी वालुकामय जमिनीत चांगले उत्पादन देते. या काकडीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असावा. या जातीच्या लागवडीसाठी थोडे गरम तापमान आवश्यक आहे.

काकडीच्या चांगल्या उत्पादनासाठी शेताची दोन ते तीन वेळा नांगरणी करून जमीन समतल करावी. या काकडीच्या लागवडीसाठी शक्यतो फक्त सेंद्रिय खताचा वापर करावा आणि बियाणे शेतात पेरणीपूर्वी पिकाचे कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सेंद्रिय औषधे फवारावीत.

काकडीच्या पिकाला जास्त ओलावा लागतो. उन्हाळ्यात पिकाला दर आठवड्याला सिंचनाची गरज असते. अशावेळी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यात सिंचनाशिवाय चांगले उत्पादन घेता येते.

काकडीच्या शेतातील तण किंवा अनावश्यक गवत काढण्यासाठी उन्हाळ्यात पिकात 20 ते 25 दिवस 3 ते 4 वेळा खुरपणी करावी. दुसरीकडे पावसाळ्यात जास्त प्रमाणात तण उगवण्याची शक्यता असते अशा वेळी वारंवार तण काढत राहावे.

सामान्य काकडींपेक्षा या जातीच्या काकडीचे (Cucumber Variety) उत्पादन जास्त येते. या जातीची लागवड करून तुम्ही एका वर्षात 2 ते 3 लाख सहज कमवू शकता.

error: Content is protected !!