Pesticide Application by Drone: ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीसाठी सरकारने वाढवून दिली 1 वर्षासाठी मुदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीसाठी (Pesticide Application by Drone) सरकारने वनस्पती संरक्षण कंपन्यांना (Plant Protection Companies) दिलेली अंतरिम मंजूरी वाढवली आहे. ही मान्यता 18 एप्रिल 2024 पासून आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे (Pesticide Application by Drone) .

मानक कार्यप्रणाली इत्यादींसह वनस्पती संरक्षण रसायने फवारणीसाठी ड्रोनच्या वापरासाठी (Pesticide Application by Drone) इतर सर्व अटी व शर्ती समान राहतील.

काही काळापूर्वी जाहीर झालेल्या पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापरासाठीच्या मानक कार्यप्रणाली (SOPs) मध्ये वैधानिक तरतुदी, उड्डाण परवानगी, क्षेत्र निर्बंध, वजनाचे  वर्गीकरण, गर्दीच्या क्षेत्रावरील निर्बंध, ड्रोन नोंदणी, सुरक्षा विमा, पायलटिंग प्रमाणपत्र, ऑपरेशन योजना, हवाई उड्डाण झोन, हवामान परिस्थिती यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

यात ऑपरेशनपूर्वी, ऑपरेशन कालावधी, आणि पोस्ट ऑपरेशन, आपत्कालीन हाताळणी प्लॅन इत्यादीचा सुद्धा मानक कार्यप्रणालीमध्ये समावेश आहे.

ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या हवाई वापरास (Pesticide Application by Drone) काही तरतुदी अंतर्गत परवानगी दिली जाईल. उदाहरणार्थ, ऑपरेटर्सनी फक्त मान्यता प्राप्त कीटकनाशकांचा (Pesticides) वापर करावा, या कीटकनाशकांचे (Pesticide Formulation) फॉर्म्युलेशन मंजूर केलेल्या तीव्रतेचे असावे, हे कीटकनाशक मंजूर केलेल्या उंचीवरूनच वापरावे.

ऑपरेटर्सने ड्रोन वॉशिंगद्वारे संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, प्रथमोपचार सुविधा सुनिश्चित करणे आवश्यक आहे तसेच सक्षम अधिकार्‍यांनी 24 तासा अगोदर कीटकनाशकांच्या हवाई वापराबद्दल (Pesticide Application by Drone) लोकांना सूचित करणे गरजेचे आहे. वैमानिकांनी कीटकनाशकांच्या प्रभावासह विशेष प्रशिक्षण घेतले असणे गरजेचे आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.

पारंपारिक कृषी पद्धतींमध्ये (Conventional Agricultural Practices), कीटकनाशकांची फवारणी हाताने किंवा ट्रॅक्टर-माऊंट फवारणी पंपाने केली जाते जेथे कीटकनाशके आणि पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते आणि या पद्धतीत फवारणी केलेल्या औषधाचा मोठा भाग वातावरणात मिसळला जाऊन वाया जातो.

सरकारने दिलेल्या या मुदत वाढीचे स्वागत करताना, क्रॉप लाइफ इंडियाचे महासचिव दुर्गेश चंद्र म्हणाले की, हे पाऊल कृषी-रासायनिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि विशेषत: ड्रोन दीदी (Drone Didi Scheme) योजनेला चालना देण्यासाठी खूप पुढे जाईल.

ड्रोन तंत्रज्ञानामुळे (Drone Technology) अचूक शेतीच्या दिशेने एक पाऊल टाकण्याबरोबरच पाण्याची प्रचंड बचत करण्यासही मदत होईल, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!