Pick Up Accident : दुर्दैवी! अपघातात एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ तिहेरी अपघात (Pick Up Accident) झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. ओतूरहुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या भाजीपाल्याच्या पिकअप ने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये एकूण पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात (Pick Up Accident) झाला आहे.

भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पिकअप आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात (Pick Up Accident) धडक झाली. डिंगोरे-पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर अहमदनगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या भाजीपाल्याच्या पिकअपने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पिकअप चालक शेतकरी आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला (Pick Up Accident Died Farmers Family)

भाजीचा पिकअप हा भरधाव वेगात होता. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात भाजीच्या पिकअपमधील पाच आणि रिक्षातील तीन असा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील एकूण पाच लोकांची ओळख पटली असून, उर्वरित तीन लोकांची ओळख पटू शकली नाही. अपघातातील ओळख पटलेल्या भाजीपाल्याच्या पिकअपमधील मृतांमध्ये शेतकरी गणेश मस्करे (वय.30 वर्ष), त्यांची पत्नी कोमल मस्करे (वय.25 वर्ष), मुलगा हर्षद मस्करे (वय.4 वर्ष), मुलगी काव्या मास्करे (वय .6 वर्ष) हे शेतकरी कुटुंब जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. तर मृतांपैकी त्यांच्यासोबत असणारा हमाल अमोल मुकुंदा ठोखे हा जालना येथील रहिवासी आहे. रिक्षातील मृताचे नाव नरेश नामदेव दिवटे (वय 66 वर्ष) जो चिपळूण (रत्नागिरी) येथील आहे. तर इतर दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

error: Content is protected !!