पीक पैसेवारी कशी काढली जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : पीक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाकडून शेतकऱ्यास मिळावयाचे विविध प्रकारचे सहाय्य हे पीक पैसेवारीवरच अवलंबून असते. पीक पैसेवारी पद्धती महाराष्ट्रात डॉ.व्ही.एम .दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिफारशीवर आधारित आहे. शासनाने वेळोवेळी पीक पैसेवारी पद्धतीबद्दल सुधारणा केली. आता ही पीक पैसेवारी म्हणजे नेमकं काय? कशी काढली जाते पैसेवारी? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

शेतकऱ्यांसाठी पीक पैसेवारी खूप महत्वाची मानली जाते. पैसेवारी काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात एक समिती तयार करण्यात येते. प्रत्येक गावाला तेथील मंडळ अधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, सरपंच हे पदसिद्ध सदस्य असतात. त्याचबरोबर प्रतिनिधि म्हणून काही परागतशील शेतकऱ्यांची निवड केली जाते. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एक महिला शेतकऱ्याचा देखील समावेश असतो. (Agriculture News)

पैसेवारीचे अंदाज कसे काढले जातात?

प्रशासनाने गावामध्ये पैसेवारीसाठी स्थापन केलेली समिती गावातील हलकी,मध्यम व चांगली अशा प्रकारच्या शेतीची निवड करते. त्यानंतर ही समिती निवडलेल्या शेतीतील लावलेल्या पिकांची वाढ,पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार यांची नोंद घेतात. त्याचबरोबर ही समिती मक्का, बाजरी आणि ज्वारी यांची पैसेवारी काढताना या पिकांची कणसे घेतात. त्यानंतर त्याचे वजन करतात आणि मग पैसे वारीचे अंदाज काढले जातात. त्यानंतर पहिल्यांदा ही पैसेवारी जाहीर केली जाते. जर समितीने पैसेवारी जाहीर केली मात्र जाहीर केलेल्या पैसेवारी वर काही आक्षेप असतील तर ते देखील मागवले जातात.

पैसेवारीवर जर नागरिकांनी यावर आक्षेप घेतला तर ही समिती गावात पुन्हा एकदा सव्र्ह पाहणी व्यवस्थितपणे करते. त्यानंतर ही पाहणी करून झाल्यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. माहितीनुसार, खरीप पिकांची पैसेवारी 15 डिसेंबर च्या आत जाहीर केली जाते. प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारी वरून दुष्काळ जाहीर केले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे जर पैसेवारी 50 पैशांच्या आत असेल तर दुष्काळ समजलाजातो.

हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि घ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती संबंधित कोणत्याही सरकारी योजनांची माहिती घ्यायची असेल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर याच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात, अर्ज कसा करायचा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल त्यामुळे लगेचच Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!