Pik Vima : पिक विमा भरण्यात कृषीमंत्र्यांचा बीड जिल्हा एक नंबर; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी उतरविला विमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने तसेच दुष्काळ पडल्यामुळे नुकसान झाल्यास सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत असते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करावा लागतो. मागच्या काही दिवसापासून बरेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत आहेत. दरम्यान खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील 18 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सात लाख 91 हजार हेक्टर वरील पिके संरक्षित झाले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी संरक्षित क्षेत्रामध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

त्याचबरोबर पिक विमा भरण्याच्या बाबतीमध्ये कृषी विभागाने अधिक प्रयत्न केल्याने पिक विमा भरण्यात बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. बीड जिल्हा हा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात भरून मिळत होता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असल्याचे दिसत आहे.

जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये पेरण्या झाल्या नव्हत्या त्यामुळे अनेक जणांनी पीक विमा भरला नव्हता. मात्र पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढून मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असल्याची माहिती समोर आली आहे. पिक विमा भरण्यासाठी बँक तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली. यामध्ये बीड जिल्ह्यातील 18 लाखांच्यावर शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पिक विमा भरला आहे.

या ठिकाणी पहा सरकारी योजनांची सविस्तर माहिती

तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शेती संबंधित कोणत्याही सरकारी योजनेची माहिती घ्यायची असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. हे ॲप आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून बनवले आहे. शेतकऱ्यांना अगदी अचूक पद्धतीने सर्व सरकारी योजनांची माहिती मिळावी. यासाठी हे ॲप बनवण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा. याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा

error: Content is protected !!