Pik Vima : ‘या’ पिकांना पिक विम्यातून वगळले, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pik Vima : नैसर्गिक आपत्ती, महापूर तसेच दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू केली. मागच्या काही दिवसापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती मिळत आहे.

काही शेतकऱ्यांच असं म्हणणं आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची आणि पपई या ही पीक जास्त प्रमाणात घेतली जातात. मात्र ही दोन्ही पिके विम्यातून वगळण्यात आले असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. बाकी इतर पीक असलेल्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे मात्र यामध्ये जर मिरची आणि पपई या पिकांचा समावेश केला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे कारण की नंदुरबार सारख्या ठिकाणी पपई आणि मिरचीचे जास्त उत्पादन घेतले जाते त्यामुळे पपई आणि मिरची या पिकांचा पीक विमा मध्ये समावेश करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

ऑगस्ट महिना चालू होताच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा मोठे संकट उभा राहिले आहे. जुलै महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पेरणी केलेली पिके देखील उगवून आले आहे. मात्र ऑगस्टमध्ये पाऊस नसल्यामुळे ही पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. त्यामुळे आता शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

‘या’ ठिकाणी मिळेल पिक विमा संबंधित सर्व माहिती

शेतकरी बंधूंनो तुम्हाला पिक विमा संबंधित कोणतीही माहिती घ्यायची असेल पिक विमा भरण्याची तारीख वाढली का? किंवा यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? अर्ज कसा करायचा आहे? याबाबत तुम्हाला कोणतीही माहिती घ्यायची असेल तर गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्सान केल्यानंतर तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!