Pik Vima Yojana : पीक विम्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांच्या संख्येत यावर्षी 27 टक्क्यांनी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 या चालू वर्षांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत आतापर्यंत देशातील एकूण 23.22 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा (Pik Vima Yojana) लाभ घेतला आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

23.22 कोटी शेतकऱ्यांना फायदा (Pik Vima Yojana Increase Farmers)

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) सुरु करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत एकूण 56.80 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी आतापर्यंत 23.22 कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी विमा रूपात भरलेल्या प्रत्येक 100 रुपयांच्या बदल्यात त्यांना केंद्र सरकारकडून 500 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

तीन वर्षात अर्जदारांमध्ये मोठी वाढ

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून दुष्काळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, महापुर, ओला दुष्काळ, कीड प्रादुर्भाव या आणि अशा अन्य नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या योजनेची आतापर्यंतची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. त्यात 2021-22 यावर्षी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 33.4 टक्क्यांनी तर 2022-23 मध्ये 41 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर आता चालू पीक वर्ष अजून संपलेले नसताना यावर्षी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत 27 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडूने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

केंद्र सरकारने 2016 मध्ये ही योजनेची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान किंवा अनपेक्षित घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून 50:50 टक्के या प्रमाणात मदत केली जाते.

error: Content is protected !!