Pik Vima Yojana : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 31 कोटींची पीक विम्याची नुकसान भरपाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून पीक विम्याची 31 कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 7 जिल्ह्यांमधील 29 हजार 438 शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Pik Vima Yojana) मिळाला आहे.

मागील वर्षी फेब्रूवारी-मार्च 2023 मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे (Pik Vima Yojana) हरियाणामधील शेतकऱ्यांची गहू, मोहरीसह हजारो हेक्टरवरील रब्बी पिके पूर्णत: भूईसपाट झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचे कृषिमंत्री जे.पी.दलाल यांनी समाजमाध्यमांवर माहिती प्रसिद्ध करत ही 31 कोटींची नुकसान भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच जमा केली जाणार असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे आता लाभार्थी शेतकऱ्यांना चालू हंगामातील गहू, मोहरी, बार्ली आणि अन्य रब्बी पिकांसाठी खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय या शेतकऱ्यांना चालू हंगामातील पिकांच्या उत्पादनवाढीसाठी देखील मदत होणार आहे.

जिल्हानिहाय विमा भरपाई (Pik Vima Yojana 31 crores For Farmers)

कृषिमंत्री जे.पी.दलाल यांच्या माहितीनुसार, हरियाणायामधील सिरसा या जिल्ह्याला सर्वाधिक 16.42 कोटींच्या पीक विम्याची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय रेवाडी (10.31 कोटी), भिवानी (1.89 कोटी), कुरुक्षेत्र (1.36 कोटी), फरीदाबाद (35,900 रुपये), कैथल (1.44 कोटी रुपये), पंचकूला (18 हजार रुपये) अशी जिल्ह्यानिहाय पीक विम्यापोटी नुकसानीची भरपाई त्या-त्या जिल्ह्यांना जाहीर करण्यात आली आहे.

आतापर्यत 11 हजार कोटींची भरपाई

दरम्यान, 9 वर्षात हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 11 हजार कोटींचा पीक विम्याची रक्कम दिली आहे. जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुपूर्द करण्यात आली आहे. याशिवाय सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या मालाची रक्कम त्यांना दिली जाते. तसेच 2014 मध्ये राज्यात 33,507 हेक्टरवर शेतकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत होते. ज्यात सध्यस्थितीमध्ये 4,26,636 हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. असेही कृषिमंत्री जे.पी.दलाल यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!