Pik Vima Yojana : केळी पीक विम्यासाठी रक्षा खडसे यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यातच मागील 2022 च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या केळी पिकाचा विमा (Pik Vima Yojana) भरला होता. मात्र या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास संबंधित कंपनीने अलीकडेच नकार दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेटली घेतली आहे.

या भेटीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील विम्याची नुकसान भरपाई (Pik Vima Yojana) तात्काळ देण्याची मागणी केली आहे. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व शोभा करंदलाजे यांची उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रक्षा खडसे यांना आश्वस्त केले आहे की, दोन ते तीन दिवसांच्या आत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्येचे निराकरण करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. या समितीकडे विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल, असेही नरेंद्रसिंह तोमर यांनी यावेळी म्हटले आहे. तर ज्या शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी पोर्टलवरून मंजुरी देण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणीचे पुढील आठ दिवसांत निराकरण केले जाईल, असेही तोमर यांनी यावेळी म्हटले आहे.

भरपाई देण्यास कंपनीचा नकार (Pik Vima Yojana For Banana Farmers)

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात 53 हजार 951 शेतकऱ्यांना केळी पीक विम्याच्या भरपाईबाबत विमा कंपनीने मंजूरी दिली आहे. तर 23 हजार 881 शेतकऱ्यांना केळी पीक विमा भरपाई देण्यास कंपनीने नकार दिला आहे. कंपनीने सर्वे करत या शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यास नकार दिला आहे. 2022 या वर्षात विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही पीक लागवड करण्यात आले नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता रक्षा खडसे यांनी याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांना साकडे घातल्याने यावर तोडगा निघून, या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या केळी पिकाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!