Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात. याबाबतची थोडक्यात माहिती जाऊन घेऊया…

काय आहे पीक विमा योजना? (Pik Vima Yojana Information)

शेती करणे तितकेसे सोपे काम नाहीये. कधी दुष्काळ, अवर्षणाची स्थिती असते. कधी ओला दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना राबविली जात आहे. यामध्ये शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा भरू शकतात. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते.

पीक विमा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?

 • पिकाचे नुकसान झाल्याचा दावा करणारा अर्ज.
 • सातबारा उतारा (त्यावर पिकाची नोंद असावी).
 • शेताचा नकाशा.
 • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड.
 • शेतकऱ्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स.
 • अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो.

कुठे कराल अर्ज?

 • जिल्ह्यातील बँक किंवा कृषी कार्यालयात जावे.
 • पीक विमा योजनेचा अर्ज भरावा.
 • पिकाची माहिती, जमिनीची माहिती, विम्याची रक्कम भरावी.
 • आधारकार्ड, जमिनीचा पट्टा, व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
 • अर्ज कृषी कार्यालयाकडे जमा करावा.
 • एक रुपया नाममात्र विम्याचा हप्ता भरावा.
 • हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्यास विमा पॉलिसी मिळेल.

18 फेब्रुवारी 2016 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दुष्काळ, चक्रीवादळामुळे झालेले पिकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, महापुराने पिकाचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ, कीड प्रादुर्भावामुळे पिकाचे झालेले नुकसान, चक्रीवादळ अशा संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

error: Content is protected !!