Pik Vima Yojana : रब्बी हंगामातही पीक विमा घोटाळा; अर्ज रद्द करण्याचे कृषी विभागाचे आदेश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपापासून राज्यातील बनावट पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालीये. खरीप हंगामात बनावट पीक विमा भरून, अनेकांनी सरकारची फसवणूक केली होती. त्याचीच ‘री’ आता रब्बी हंगामात देखील ओढली (Pik Vima Yojana) जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झालीये. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे जिल्ह्यात यावर्षी पाच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांचा विमा भरण्यात आला आहे. त्यामुळे आता याबाबत कृषी विभागाला खडबडून जाग आली असून, याबाबत विमा कंपन्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.

यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा (Pik Vima Yojana) भरला असेल. त्यांना संबंधित पिकाची भरपाई मिळणारच आहे. मात्र, ज्यांनी आपल्या शेतामध्ये पिकांची लागवड केलेली नसतानाही विमा भरून सरकारची फसवणूक केली असेल. अशा शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्याचे आदेश कृषी विभागाने विमा कंपनीला दिले आहे. खरीप हंगामामध्ये काहींनी सरकारच्या जमिनीवर देखील पीक विमा भरून सरकारची फसवणूक केली होती. त्यामुळे कडक पावले उचलत कृषी विभागाने हे आदेश दिले असल्याचे सांगितले जात आहे.

खरीप हंगामात कोट्यवधींची फसवणूक (Pik Vima Yojana Scam Rabi Season)

शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी एक रुपयांमध्ये पीक विमा भरण्याची सोय सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याचाच फायदा घेऊन काही जण सरकारची फसवणूक करत आहे. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात असे अनेक प्रकार समोर आले होते. सरकारी जमिनीवर विमा भरून सरकारकडून पैसे मिळवण्यात आले होते. तर शेजारील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका व्यक्तीने स्वतःची तब्बल साडेचार हजार हेक्टर अर्थात 11 हजार एकर जमीन दाखवली होती. यामध्ये या व्यक्तीने 23 जिल्ह्यांमध्ये 200 ठिकाणी पीक विमा भरला होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला केवळ २०० रुपये भरून जवळपास १४ कोटींची रक्कम मिळणार होती. कृषी विभागाच्या चौकशीत ही बाब समोर आली होती. त्यामुळे सरकारकडून रब्बी हंगामातील पीक विम्याबाबत सर्तकतेचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

error: Content is protected !!