Pik Vima Yojana : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पिकविमा मंजूर – मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) खरीप हंगाम 2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच आतापर्यंत अग्रीम रकमेअंतर्गत राज्यातील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 2200 कोटींची रुपयांची ऐतिहासिक रक्कम (Pik Vima Yojana) मंजूर करण्यात आल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत म्हटले आहे.

विधानसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना 2206 कोटींच्या विक्रमी रकमेचा पीक विमा (Pik Vima Yojana) मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 1700 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तर उर्वरित 500 कोटी रुपयांचे वितरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. धुळे जिल्ह्यातील आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी ही माहिती सभागृहात दिली आहे. यावेळी धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 69 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते. असेही त्यांनी पिकविमा प्रश्नावर बोलताना म्हटले आहे.

कंपनीचे अपील फेटाळले (Pik Vima Yojana In Maharashtra)

पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावरून धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील वस्तुस्थिती दर्शक आकडेवारी विधानसभा सभागृहात सादर केली. धुळे जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या एचडीएफसी या विमा (Pik Vima Yojana) कंपनीने अग्रीम अधिसूचनेच्या विरोधात जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच राज्य सरकारकडे अपील केले होते. कंपनीचे हे अपील राज्य सरकारने फेटाळून लावले आहे. धुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना 69 कोटी रुपये इतका विमा आजपर्यंत अग्रीम अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहात म्हटले आहे.

हिंगोली जिल्ह्यात लवकरच वितरण

हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एचडीएफसी इरगो ही विमा कंपनी नियुक्त आहे. या विमा कंपनीचे अपील केंद्र सरकारकडे प्रलंबित असून, याबाबतची सुनावणी केंद्र सरकारकडून लवकरच केली जाईल व हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याचे देखील अग्रीम प्रमाणे वितरण लवकरच केले जाईल, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी विधानसभा आमदार राजू नवघरे यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नावर बोलताना दिली आहे.

error: Content is protected !!