Pik Vima Yojana : पीक विम्याच्या यादीत आपले नाव कसे शोधायचे; पहा… संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यासांठी विविध योजना (Pik Vima Yojana) राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनके प्रकारचे लाभ दिले जात आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी पीक विमा योजना होय. देशातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकरी या योजनेसाठी अर्ज तर करतात. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या यादीत (Pik Vima Yojana) आपले नाव आले आहे की नाही? हे कसे चेक करायचे याबाबत माहिती नसते. त्यामुळे आज आपण यादीत नाव कसे चेक करायचे? हे थोडक्यात समजून घेणार आहोत…

असे चेक करा स्वतःचे नाव (Pik Vima Yojana List Name Check)

  • सर्वप्रथम तुम्हाला pmfby.gov.in या पंतप्रधान शेतकरी पीक विमा योजनेच्या (Pik Vima Yojana) सरकारी संकेतस्थळाला आपल्या मोबाईलमध्ये ओपन करावे लागेल.
  • त्या ठिकाणी होम पेज “Beneficiary list” हा ऑप्शन दिसेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर नवीन विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुमचे राज्य निवडा.
  • तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा.
  • शेवटी तुमचा तालुका किंवा ब्लॉक निवडा.
  • तुमच्यासमोर पंतप्रधान शेतकरी पीक विमा योजनेची संपूर्ण यादी दिसेल.
  • त्यात तुम्ही सहजपणे तुमचे नाव शोधू शकता.

कधी मिळतो पीक विमा?

केंद्र सरकारने 18 फेब्रुवारी 2016 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेती करणे तितकेसे सोपे काम नाहीये. कधी दुष्काळ, अवर्षणाची स्थिती असते. कधी ओला दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो. त्यामुळे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दुष्काळ, चक्रीवादळामुळे झालेले पिकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, महापुराने पिकाचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ, कीड प्रादुर्भावामुळे पिकाचे झालेले नुकसान अशा संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

कुठे करावा लागतो पीक विम्यासाठी अर्ज?

  • जिल्ह्यातील बँक किंवा कृषी कार्यालयात जावे.
  • पीक विमा योजनेचा अर्ज भरावा.
  • पिकाची माहिती, जमिनीची माहिती, विम्याची रक्कम भरावी.
  • आधारकार्ड, जमिनीचा पट्टा, व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज कृषी कार्यालयाकडे जमा करावा.
  • एक रुपया नाममात्र विम्याचा हप्ता भरावा.
  • हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्यास विमा पॉलिसी मिळेल.
  • याशिवाय pmfby.gov.in संकेतस्थळावर देखील विचारलेली माहिती भरून योजनेसाठी अर्ज करता येतो.

कोणती कागदपत्रे लागतात?

  • पिकाचे नुकसान झाल्याचा दावा करणारा अर्ज.
  • सातबारा उतारा (त्यावर पिकाची नोंद असावी).
  • शेताचा नकाशा.
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड.
  • शेतकऱ्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स.
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो.
error: Content is protected !!