Pik Vima Yojana : 1 रुपयात पीक विमा काढण्यासाठी ही कागदपत्रे आहेत बंधनकारक; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pik Vima Yojana : निसर्गाचं चक्र बदलल्याने सर्वात जात तोटा हा शेतकऱ्याचा होत असतो. महाराष्ट्रात मागच्यावर्षी शेतकऱ्यांचं अवकाळी पावसाने (unseasonal rain) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना हे नुकसान सहन न झाल्याने काहींनी आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. तरी अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.

मात्र आता शेतकऱ्यांना फक्त १ रुपयामध्ये (1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra) पीक विमा (Crop insurance) मिळणार आहे. त्यामुळे यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात हे तुम्हाला माहित आहे का? चलातर मग जाणून घेऊया यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.

कागदपत्रे जाणून घेण्याआधी शेतकरी मित्रांनो एक महत्वाची माहिती तुमच्यासाठी. तुम्हाला जर अगदी सोप्या पद्धतीने सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच प्लेस्टोअरवरून Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल त्याचबरोबर, हवामान अंदाज, बाजारभाव, जमीन मोजणी, खतांबद्दल माहिती, पशूंची खरेदी विक्री इत्यादींची माहिती तुम्हाला लगेच समजेल. त्यामुळे Hello Krushi हे अँप लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्ही तुमच्या जमिनीची नोंदणी देखील करू शकता.

पीक विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

१) पीकपेरा स्वयं घोषणापत्र
२) सातबारावर उतारा
३) आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक
४) सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र.

error: Content is protected !!